कुक्कुटपालनाने पाकिस्तानची गरिबी दूर करणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2018
Total Views |

 

 
 
इस्लामाबाद : पाकिस्तानातील ग्रामीण भागातील गरिबी दूर करण्यासाठी पंतप्रधान इमरान खान यांनी कुक्कुटपालन योजना आखली आहे. पाकिस्तानातील ग्रामीण भागातील गरिबी दूर करण्यासाठी तेथील महिलांना कुक्कुटपालनासाठी कोंबड्या दिल्या जाणार आहेत. अशामुळे पाकिस्तानातील गरिबी दूर होईल. असे पंतप्रधान इमरान खान यांना वाटते.
 

इमरान खान यांच्या या नव्या धोरणावर पाकिस्तानातील विरोधी पक्षनेत्यांना हसू आवरता येत नाही. विरोधक इमरान खान यांच्या कुक्कुटपालनाच्या योजनेवर टीकेचा भडीमार करत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी या विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले आहे. संकोचित मानसिकता असलेले लोक या योजनेवर टीका करत आहेत. परदेशात जर अशी ही योजना आणली असती तर याच लोकांनी तिचे कौतुक केले असते. बिल गेट्स यांनी कुक्कुटपालनाची अशीच कल्पना आपल्या एका लेखात मांडली होती. हा लेख इमरान खान यांनी ट्विट केला आहे.

 
 
 

पाकिस्तानात इमरान खान यांच्या सरकारला सत्तेत येऊन १०० दिवस पूर्ण झाले. त्याबद्दल एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सरकारकडून गरीब महिलांना पोएट्री सुरू करून देण्यात येणार असल्याचे इमरान खान यांनी या कार्यक्रमात सांगितले होते. जेणेकरून त्या महिला आपला स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकतील. कुक्कुटपालनाला गती मिळावी. म्हणून कोंबड्यांना देण्यासाठी इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशी माहिती इमरान खान यांनी दिली होती.

 

इमरान खान यांच्या या कुक्कुटपालन योजनेची विरोधकांनी खिल्ली उडवली. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान यांचा हा विनोदी कार्यक्रम असल्याचे विरोधकांनी म्हटले. पाकिस्तानची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पंतप्रधान इमरान खान हे गुगलवर उपाय शोधत आहेत. असे करण्यापेक्षा त्यांनी पाकिस्तानची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी गंभीर पावले उचलण्याचा विचार करावा. असे विरोधकांनी म्हटले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@