चंद्रपूरमध्ये पासपोर्ट सेवा केंद्राचा शुभारंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2018
Total Views |

 


 
 
चंद्रपूर : चंद्रपूर येथील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. एका स्वतंत्र दालनात सोमवारी या पासपोर्ट कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. विदेश मंत्रालयाने देशातील नागरिकांना शिक्षण, उपचार आणि पर्यटन, व्यवसायासाठी जगाचे दालन खुले व्हावे. यासाठी पासपोर्ट उपलब्धतेला अधिक प्राधान्य दिले आहे.
 

या कार्यक्रमाला गृहराज्यमंत्री हंसराज आहिर यांच्यासह केंद्रीय सचिव ज्ञानेश्वर मुळे उपस्थित होते. ज्ञानेश्वर मुळे हे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील परदेशी नागरिकांच्या सोयी, सुविधा आणि पासपोर्ट संदर्भातील विभागांचे कामकाज पाहतात. तसेच या पासपोर्ट कार्यालयाच्या उद्घाटनाला चंद्रपूरचे आमदार नानाभाऊ शामकुळे, महापौर अंजलीताई घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले तसेच चंद्रपूरचे माजी नगराध्यक्ष विजय राऊत, पोस्ट मास्टर जनरल रामचंद्र जायभाये हे उपस्थित होते.

 

पासपोर्ट कार्यालयाचे विभागीय व्यवस्थापक सी.एल.गौतम वरिष्ठ पोस्टमास्टर बी.हुसेन अहमद आणि वरिष्ठ टपाल अधीक्षक एस.एस. पाठक यांच्यासह शहरातील अन्य मान्यवरदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. आधी नागपूर मग वर्धा आणि आता चंद्रपूर येथे पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात आले आहे. चंद्रपूरात सुरू होणारे पासपोर्ट कार्यालय हे भारतातील २३८ वे कार्यालय आहे. विदर्भातील हे ८ वे कार्यालय आहे. त्यानंतर लवकरच अमरावती येथील कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@