यजुर्वेंद्र महाजन यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2018
Total Views |

 
जळगाव : 
 
जळगावमध्ये दिव्यांग युवक-युवतींसाठी मोफत निवासी, स्पर्धा परीक्षा, स्वयंरोजगार, मार्गदर्शन केंद्र चालवून त्यांना जगण्याचे बळ देणारे, स्वत:च्या पायावर उभे करणारे यजुर्वेंद महाजन यांना यंदाचा ’राष्ट्रीय हेलन केअर’ हा मानाचा पुरस्कार केंद्रीय राज्यमंत्री डॉ.सत्यपाल सिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
 
‘साईन लँग्वेज’च्या माध्यमातून एकामेकांसोबत व्यक्त होणारे दिव्यांगजन श्रोते, दिव्यांगासाठी काम करणार्‍या सेवाभावी संस्थेंच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ‘नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लायमेंट फॉर डिसेबल्ड पीपल’(एनसीपीईडीपी) संस्थेचा हा पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला. एकूण 3 श्रेणीत पुरस्कार देण्यात आले.
 
रविवारी सकाळी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित या सोहळ्यात देशातील विविध भागातून आलेल्या दिव्यांग जणांनी सहभाग घेतला.
 
यजुर्वेंद्र महाजन यांच्या मनोबल केंद्राच्या माध्यमातून शंभराहून अधिक गरीब, दलित, आदिवासी, वंचित, शोषीत, कुटुंबातील दिव्यांग तरुण-तरुणी मोफत निवासी प्रशिक्षण घेत आहेत. मनोबलच्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमद्धे यश संपादन केले आहे.
 
दिव्यांगांना रोजगार देणार्‍या संस्था या गटात महाजन यांना हा सन्मान देण्यात आला. निवृत्त सनदी अधिकारी सौरभ चंद्रा, माईंडट्री चे अब्राम मोसेस, अनुप श्रीवास्तव तसेच गीता दंग यांच्या निवड समितीने पुरस्कारप्राप्त विजेत्यांची निवड केली.
@@AUTHORINFO_V1@@