नवलखांच्या अटकेची परवानगी द्या; राज्य सरकारने मागितली न्यायालयात परवानगी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2018
Total Views |


नवी दिल्ली : कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणात मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखांना अटक करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात परवानगी मागितली आहे. या प्रकरणाची सुनावणी सोमवारपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू झाली दरम्यान पुढील सुनावणी ११ डिसेंबर रोजी होणार आहे.

 

पुणे शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषद झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमा भागात दोन गटांमध्ये हिंसाचार झाला होता. पुणे पोलिसांनी याप्रकरणी देशभरात छापे टाकून संशयित नक्षलवाद्यांच्या ताब्यात घेत त्यांच्याकडून कागदपत्रे, लॅपटॉप, हार्ड डिस्क, पेन ड्राइव्ह, मेमरी कार्ड जप्त केले.

 

कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी ऑगस्टमध्ये देशात विविध ठिकाणी छापे टाकले. त्यावेळी वरवरा राव, फरेरा, भारद्वाज यांना अटक झाली होती. दरम्यान या प्रकरणात नवलखा यांना अद्याप ताब्यात घेतलेले नाही. याविषयी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरवात झाली. पुढील सुनावणी ११ डिसेंबर रोजी होणार आहे. महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले आहे. त्यात नवलखा यांच्या अटकेची परवानगी मागण्यात आली आहे. नवलखा यांचे अन्य आरोपींशी संबंध असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

एल्गार प्रकरणात दोषारोपपत्र पुणे पोलिसांनी सात दिवसात सर्वोच्च न्यायालयात सादर करावे '', असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. एल्गार परिषदेचा माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी अटक केलेल्या अॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्यासह पाच जणांवर पुणे सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. मात्र, यासाठी पुणे पोलिसांनी यूएपीए कायद्यातील तरतुदीप्रमाणे, ९० दिवसांची मुदतवाढ मागितली होती. बचावपक्षांनी त्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने ही मुदतवाढ रद्द केली होती. दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया बेकायदेशीर ठरवली.

 

उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर राज्य सरकारने स्थगिती मागितली व निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यावर पुणे पोलिसांना ते दोषारोपपत्र सात दिवसात दाखल करायला सांगितले आहे. अॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्या जामीनाची सुनावणी आज पुणे सत्र न्यायालयात होणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@