गोहत्येच्या संशयावरून उत्तर प्रदेशमध्ये उद्रेक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2018
Total Views |

 


 
 
बुलंदशहर : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात गोहत्येच्या संशयावरून हिंसक आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली. या दरम्यान पोलीस स्टेशनवर आंदोलकांनी दगडफेक केली. या पोलीस स्टेशन बाहेर उभी असलेली पोलीसांची गाडी आंदोलकांनी पेटवली. पोलीस स्टेशनवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एका पोलीस निरिक्षकाचा आणि अन्य एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 
 

बुलंदशहरातील एका गावात गोहत्या झाल्याची अफवा पसरली होती. गोहत्या झाल्याच्या संशयावरून काही आंदोलकांनी बुलंदशहरात हिंसक आंदोलन केले. या घटनेची माहिती मिळाल्यावर तातडीने पोलीस या घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी पोलीस आणि या आंदोलकांमध्ये चकमक झाली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलीसांनी गोळीबार केला. पोलीसांनी केलेल्या या गोळीबारात एक तरुण जखमी झाला. ही बातमी पसरताच या संतप्त आंदोलकांनी पोलीस स्टेशनवर हल्ला केला. पोलीस स्टेशनवरील या हल्ल्यात पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेमुळे बुलंदशहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून या ठिकाणी अनेक पोलीसांना तैनात करण्यात आले आहे. बुलंदशहरात झालेल्या या हिंसक घटनेमुळे उत्तर प्रदेशातील औरंगाबादहून जाणारी रस्तेवाहतूक जहांगिराबादमार्गे वळविण्यात आली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@