जी-२० देशांची तेरावी शिखर परिषद भारत होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2018
Total Views |



नवी दिल्ली : २०२२ मध्ये होणारी जी-२० देशांची तेरावी शिखर परिषद भारत होणार आहे. याबाबतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जेंटिना येथे केली. २०२२ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने इटलीमध्ये होणारी ही परिषद भारतात होणार आहे. जी २० देशांच्या अर्थव्यवस्थेत जगाचे ९० टक्के उत्पन्न सामावलेले असून, जागतिक व्यापाराचा ८० टक्के भाग या देशात आहे.

 

२०२२ ला होणाऱ्या जी-२० देशांची परिषदेचे यजमानपद इटलीकडे होते. मात्र, २०२२ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने पंतप्रधान मोदींनी या परिषदेचे यजमानपद भारताला द्यावे अशी विनंती इटलीला केली. यानंतर इटलीने सकारात्मक प्रतिसाद देत, २०२२ च्या परिषदेचे भारताला यजमानपद देऊ केले. त्यामुळे आता २०२२ मध्ये इटलीत होणारी ही परिषद आता भारतात होणार आहे. यानंतर पंतप्रधान मोदींनी इटलीचे आभार मानले.

 

२०२२ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या विशेष वर्षात भारत जी-२० शिखर परिषदेचे स्वागत करणार आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजेच भारतात यावे. भारताचा संपन्न इतिहास, विविधता यांचा अनुभव घ्यावा तसेच भारताचे आदरातिथ्यही बघावे. अशी माहिती पंतप्रधान मोदींनी आपल्या अधिकृत ट्विटरवर दिली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@