बंजारा समाजासाठी सरकार कटीबद्ध : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2018
Total Views |
 
 

मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर



वाशीम : वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी गावात विविध विकासकामांचे भूमीपूजन व संत सेवालाल महाराज नंगारारुपी संग्रहालयाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवारी पार पडला. यावेळी बंजारा समाजाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांशी बंजारा भाषेत संवाद साधला. बंजारा बोली भाषा म्हणून टिकून रहावी म्हणून विशेष प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी येथे वर्धा-यवतमाळ रेल्वे मार्गावर पोहरागड स्टेशन उभारण्याची घोषणा केली. संत सेवालाल स्मारकांसाठी उर्वरीत १०० कोटी लवकरच दिले जातील, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. सेवालाल महाराराजाचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे. बंजारा समाजाच्या संस्कृतीचे संर्वधन करण्यासाठी ॲकॅडमी उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस,शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर एकत्र होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘मला मोह आवरला नाही. म्हणून आपण बंजारा भाषेत बोललो.बंजारा समाजाला ज्या अडचणी भेडसावत आहेत त्या सोडवणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

 

बंजारा भाषा टिकण्यासाठीही विशेष प्रयत्न केले जातील असेही मुख्यमंत्री म्हटले आहेत. ब्रिटिशांविरोधात सेवालाल महराजांनी पहिला एल्गार पुकारला त्यामुळे सेवालाल महाराज यांचं योगदान खूप मोठं आहे असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. बंजारा समाजाने तयार केलेल्या वस्तू जगभरात पोहचाव्यात यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. बंजारा समाजाच्या पाठिशी हे सरकार ठामपणे उभे आहे, असे आश्वासन बंजारा समाजाच्या महान जनसागरापुढे मी देतो असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

  

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@