शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डायलिसीस विभाग कार्यान्वित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2018
Total Views |

वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन


 
जळगाव : 
 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरु करण्यात आलेल्या डायलिसीस विभागाचे उद्घाटन शनिवार रात्री वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
 
यावेळी आ.सुरेश भोळे, आ. स्मिता वाघ, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष उदय, डॉ. सिद्धार्थ चौधरी, डॉ. धमेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
 
 
वैद्यकीय महाविद्यालयात सुरु असलेल्या डायलिसिस विभागात सद्यःस्थितीत आठ यंत्र असून आणखी पाच यंत्रांची गरज असल्याचे अधीष्ठाता खैरे यांनी ना. महाजन यांना सांगितले.
 
तसेच वैद्यकीय महाविद्यालयाची मंगळवारी केंद्रीय समितीकडून तपासणी होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, आणखी पाच यंत्र उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले.
 
 
यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आणि रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.
@@AUTHORINFO_V1@@