मुलुंडमध्ये टोलमाफीसाठी स्थानिकांचे आंदोलन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2018
Total Views |



ठाणे : सोमवारी सकाळी मुलुंड टोलनाक्यावर भाजपचे नगरसेवक आणि स्थानिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. टोलपासून १० किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या नागरिकांना टोल माफ असल्याचा अध्यादेश असतानासुद्धा स्थानिक नागरिकांकडून टोल घेतला जातो. यासाठी स्थानिकांनी आंदोलन केले.

 

"ठाण्यातील कोपरी इथे राहणाऱ्या स्थानिकांच्या गाड्यांना टोल नाक्यावरुन जाताना पहिले प्राधान्य द्यावे. अवघ्या काही मीटर अंतरासाठी कोपरीकरांना टोलच्या रांगेत उभे राहून टोल भरावा लागतो. यापासून कोपरीकरांची सुटका करावी." अशी मागणी भाजपचे नगरसेवक भारत चव्हाण यांनी केली. यावर वारंवार चर्चा होऊन देखील स्थानिकांकडून टोलवसुली केली जात आहे असेही त्यांनी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@