सामूदायिक विवाह सोहळे काळाची गरज : आ.एकनाथराव खडसे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2018
Total Views |
 

लेवा पाटीदार समाजाच्या मेळाव्यात 355 विवाहेच्छूकांनी दिला परिचय, जुळणार 35 विवाह


 
 
जळगाव : 
 
लेवा पाटीदार समाजात सामूदायिक विवाह सोहळे होणे काळाची गरज आहे. तसेच या समाजाची वैचारिक पातळीही उंचावणे आवश्यक असल्याचे मत माजी महसूल मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले.
 
लेवा पाटीदार समाजाची अग्रगण्य युवा संघटना लेवा नवयुवक संघातर्फे विश्वस्तरीय विवाहेच्छूक वधू-वर परिचय महामेळावा 2 रोजी एम.जे.कॉलेजच्या पटांगणावर पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
 
मेळाव्यात विवाहेच्छूक 265 वधू व 190 वरांनी त्यांचा परिचय करुन दिला. सुमारे 35 विवाह जुळण्याची शक्यता आहे. या व्यक्ती उच्चशिक्षीत कुटुंबातील आहेत. मेळाव्यास देश-विदेशातील लेवा पाटीदार समाजबांधव उपस्थित होते.
 
 
प्रमुख पाहुणे म्हणून लेवा पाटीदार समाजाचे कुटुंबनायक रमेश पाटील, खा. रक्षाताई खडसे, आ. सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. पी. पाटील, माजी महापौर ललित कोल्हे, डॉ. ए. जी. भंगाळे, अ‍ॅड. प्रकाश बी.पाटील, सुनील बढे, अनिल नारखेडे आदी उपस्थित होते.
 
 
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने झाली. सैन्यात मेजर जनरल म्हणून पदोन्नती मिळालेल्या जगदीश चौधरी यांचा सत्कार त्यांचे बंधू विश्वास चौधरी यांनी स्वीकारला.
 
 
भव्य मंडपात अत्याधुनिक क्लोज सर्किट टी.व्ही.ची सुविधा व विवाहेच्छूकांच्या परिचयासाठी भव्य व्यासपीठावर शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, आय.ए.एस., आय.पी.एस. आणि उच्चशिक्षीत, व्यापारी, उद्योजक व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ यांनीही परिचय करुन दिला. कोणताही भेदभाव नसणे, हे या महामेळाव्याचे वैशिष्ट्य होते.
 
 
‘विवाही डॉट कॉम’ या मेट्रीमनी वेबसाईटवर विनामूल्य विवाहेच्छूंचे नाव नोंदण्याची सुविधा मयूर चौधरी यांनी केलेली होती. सूत्रसंचालन नितीन नेमाडे, प्रा. राजेश वाघुळदे, प्रणिता झोपे, प्रीती चौधरी, ऋति भोळे यांनी केले.
 
 
यशस्वीतेसाठी लक्ष्मीकांत चौधरी, हितेंद्र चौधरी, सुनिल महाजन, सुभाष भोळे, राजेश चौधरी, के.पी. चौधरी, प्रवीण राणे, किरण बेंडाळे, डॉ. मोहन बेंडाळे, किरण चौधरी, अनिल चौधरी, हितेंद्र चौधरी, नारायण आटाळे, संजय चौधरी, नीळकंठ नारखेडे, डिगंबर पाटील, कैलास पाटील, किरण अत्तरदे, जयेश भोळे, योगेश भोळे, नितीन नेमाडे यांनी परिश्रम घेतले.
@@AUTHORINFO_V1@@