शबरीमला आंदोलन दडपण्याचे डाव्यांचे उद्योग!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2018   
Total Views |



 
 
शबरीमला आंदोलन दडपण्यासाठी १ जानेवारी रोजी ‘ग्रेट वॉल ऑफ केरळ’ उभारण्याचा निर्धार पी. विजयन सरकारने केला असला तरी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. प्रगतिशील राज्याला अंधारयुगात नेण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असे मुख्यमंत्री विजयन यांनी म्हटले असले तरी हिंदू समाजाच्या आंदोलनामुळे केरळमधील डाव्या सरकारच्या उरात धडकी भरली असल्याचेच सरकार जे निर्णय घेत आहे, त्यावरून दिसून येत आहे.
 
 

सर्वोच्च न्यायालयाने केरळमधील शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांच्या महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय गेल्या सप्टेंबर महिन्यात दिला असला तरी त्या निर्णयाविरुद्ध केरळमधील हिंदू समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटली. त्या निर्णयाविरुद्ध महिलांच्या उत्स्फूर्त सहभागासह जी प्रचंड आंदोलने उभी राहिली, त्यामुळे त्या मंदिराची कित्येक शतकांची परंपरा मोडण्याचे साहस अद्याप कोणास करता आलेले नाही. शबरीमला मंदिर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात काही दिवसांसाठी खुले झाले होते. त्यावेळी या मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न काही महिलांनी केला होता. पण, या महिलांना मंदिरप्रवेशापासून रोखण्यात आले. अय्यप्पास्वामींच्या दर्शनाच्या ओढीने त्या पुरोगामी महिला कार्यकर्त्यांचा मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न चाललेला नव्हता, हे येथे लक्षात घ्यायला हवे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना या मंदिराची परंपरा लक्षात घेतली असती तर आपल्याच निकालाची अवहेलना झाल्याचे त्या न्यायालयास पाहावे लागले नसतेगेल्या १७ नोव्हेंबरपासून ६४ दिवसांच्या शबरीमला वार्षिक यात्रेस प्रारंभ झाला आहे. या यात्रेसाठी हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास होणारा विरोध मोडून काढण्यासाठी केरळमधील मार्क्सवादी सरकारने जय्यत तयारी केली असली तरी हिंदू समाजाचा जो प्रचंड विरोध होत आहे, तो पाहता या मंदिराच्या परंपरेचे उल्लंघन करणे कोणालाही शक्य झालेले नाही. शबरीमला देवस्थानाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध केवळ भाजप आणि संघ परिवार आंदोलन करणाऱ्यांच्या बाजूने उभा राहिला आहे. एवढेच नाही तर केरळमधील काँग्रेस पक्षानेही आंदोलकांची बाजू घेतली आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अय्प्पाभक्तांनी चालविलेल्या आंदोलनामुळे केरळमधील डाव्या सरकारचे पित्त खवळले असून हे आंदोलन चिरडण्याचे सर्व ते प्रयत्न चालू आहेत. जमावबंदीचा आदेश जारी करणे, भक्तांची मोठ्या प्रमाणात धरपकड करणे, अय्यप्पास्वामींचा जयघोष केल्यावरून भक्तांची धरपकड करणे, त्यांना अमानुष मारहाण करणे, असले प्रकार त्या राजवटीकडून चालू आहेत. एवढी दडपशाही चालू असली तरी हिंदू समाजाच्या भावनेचे उल्लंघन करून शबरीमला मंदिरात विशिष्ट वयोगटातील कोणीही महिला जाऊ शकलेली नाही. आता केरळ उच्च न्यायालयाची मदत घेऊन हे आंदोलन दडपून टाकण्याचे प्रयत्न विजयन सरकारने चालविले आहेत. असे असले तरी केरळ भाजपने आपले आंदोलन अधिक तीव्र करण्याचे ठरविले आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शाह हे केरळच्या दौऱ्यावर आले असताना, या आंदोलनाला भाजपचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. शबरीमला आंदोलनाला बळ मिळू नये म्हणून निलक्कल, पम्बा, सन्निधानम या परिसरात सरकारने १४४ कलम जारी केले आहे. हे कलम मागे घ्यावे यासह अन्य मागण्यांसाठी भाजपच्या शिष्टमंडळाने राष्ट्रीय महासचिव सरोज पांडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल पी. सदाशिवम यांची भेट घेतली. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस के. सुरेंद्रन यांच्याविरुद्ध अनेक खोटे गुन्हे नोंदविण्यात आले असल्याचा आरोप या शिष्टमंडळाने केला आहे. शबरीमला देवस्थानी भाविक गटागटाने येत असतात. त्यामुळे त्या भागात १४४ कलम जारी करणे समर्थनीय नाही, असे राज्यपालांना सांगण्यात आले. बंदीहुकूमाच्या नावाखाली पोलीस यात्रेकरूंना त्रास देत असल्याची तक्रारही करण्यात आली. शबरीमला परिसरात शांतता नांदावी, यासाठी राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंती भाजपच्या शिष्टमंडळाने केली. दुसरीकडे, मंदिराच्या मार्गांवर विविध ठिकाणी जे अडथळे उभारण्यात आले आहेत ते काढले जाणार नाहीत, असे देवस्थानमंत्री कडकमपल्ली सुरेंद्रन यांनी स्पष्ट केले आहे.

 

केरळमधील हिंदू समाज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध एकवटत असल्याने तेथील मार्क्सवादी सरकारच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. त्यातूनच या आंदोलनात फूट पाडण्याचे उद्योग सरकारने चालविले आहेत. सरकारने हिंदू समाजातील जातीजमातींच्या संघटनांची एक बैठक गेल्या शनिवारी बोलाविली होती. या बैठकीस विविध संघटनांचे १७० प्रतिनिधी उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. बैठकीस मुख्यमंत्री विजयन यांनी मार्गदर्शन केले. शबरीमला आंदोलनाची धार कमी करण्यासाठी येत्या १ जानेवारी रोजी केरळच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत म्हणजे कासरगोड ते तिरुवनंतपुरमपर्यंत अशी १० लाख महिलांचा सहभाग असणारीमानवी भिंत’ उभारण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पण त्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीतला यांनी केली आहे. सरकारने ‘मानवी भिंत’ उभारण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो निर्णय म्हणजे ‘शर्करावगुंठीत विष’ असून अशी कृती करून मार्क्सवादी सरकार जातीजातींचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. सरकारने १९० संस्थांना निमंत्रण पाठविले होते, पण केवळ ८० संस्थाच त्यात सहभागी झाल्या होत्या, असे सांगून सरकारचे पितळ त्यांनी उघडे पाडले. या बैठकीस आलेल्या दोन शक्तीशाली संघटनांनी सरकारच्या भूमिकेस विरोध केला होता, तसेच महिलांची ‘मानवी भिंत’ तयार करण्यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली, त्यात एकाही महिलेचा समावेश नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शबरीमलाबाबत सरकारने जी पावले उचलली त्याच्या निषेधार्थ युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटच्या वतीने उद्या, ५ डिसेंबर रोजी केरळमधील १४० विधानसभा मतदार संघात ‘धरणे’ धरण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. शबरीमला आंदोलन दडपण्यासाठी १ जानेवारी रोजी ‘ग्रेट वॉल ऑफ केरळ’ उभारण्याचा निर्धार पी. विजयन सरकारने केला असला तरी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. प्रगतिशील राज्याला अंधारयुगात नेण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असे मुख्यमंत्री विजयन यांनी म्हटले असले तरी हिंदू समाजाच्या आंदोलनामुळे केरळमधील डाव्या सरकारच्या उरात धडकी भरली असल्याचेच सरकार जे निर्णय घेत आहे, त्यावरून दिसून येत आहे.

 

सरकारने काहीही कृती केली तरी शबरीमला आंदोलनास हिंदू समाजाचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळत आहे. त्याचे एक उदाहरण म्हणजे आंदोलनाच्या बाजूने असलेल्या ‘जानम टीव्ही’ या चित्रवाहिनीची लोकप्रियता महिन्याभरात प्रचंड प्रमाणात वाढली आहे. ‘एशिया न्यूज नेट’ नंतर आता ही वाहिनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. ‘आम्ही भक्तांसमवेत आहोत,’ असे पहिल्या दिवसापासून या वाहिनीने सांगितल्यामुळे त्या वाहिनीची लोकप्रियता वाढली आहेकेरळमधील हिंदू समाजास सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अमान्य आहे. त्याविरुद्ध तो पेटून उठला आहे. पण, डावे सरकार ते आंदोलन सर्व त्या मार्गांचा वापर करून चिरडून टाकण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी डावे सरकार जे डावपेच खेळत आहे ते कितपत यशस्वी होतात ते नजीकच्या काळात दिसून येणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@