शेवटच्या दिवशी अंतिम परीक्षेसाठी 2 हजार 934 युवक पात्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2018
Total Views |

सैन्य भरतीसाठी नऊ जिल्ह्यातून आले होते युवक

जळगाव : 
 
शहरातील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदारावर 20 नोव्हेंबरपासून सुरु असलेल्या सैन्य भरतीमध्ये अंतिम परीक्षेसाठी सुमारे 2 हजार 934 युवक पात्र ठरले आहेत.
 
दरम्यान, सैन्य भरतीसाठी 9 जिल्ह्यातून एकूण 68 हजार युवकांनी नोंदणी केली होती. रविवारी शेटवचा दिवस होता त्यात हिंगोली जिल्ह्यातील 105 युवकांची निवड करण्यात आली आहे. तर 120 युवकांना मेडिकलसाठी पुणे व अहमदनगर येथे या आठवड्यात बोलविण्यात येणार आहे.
 
भरती प्रक्रियेत औरंगाबाद मिलिटरी कॅम्प येथील कर्नल ए.के. कालीया हे उपस्थित होते. सैन्य भरतीसाठी राज्यभरातून आलेल्या उमेदवारांची मैदानावर सुविधा करण्यात आली होती.
 
परंतु मैदानाबाहेर प्रशासनाने कोणतेही नियोजन न केल्याने उमेदवारांचे हाल झाले होते. युवकांना शहरातील काही संस्थांनी भोजन, निवारा देण्यासाठी पुढे आल्या होत्या.
@@AUTHORINFO_V1@@