नववर्षाच्या निमित्ताने अमली पदार्थ विरोधी पथक सज्ज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Dec-2018
Total Views |



मुंबई - सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज आहेत. यासाठी मुंबईमध्ये विविध ठिकाणी अमली पदार्थांच्या रेव पार्टीचे आयोजन केले जाते. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या माफियांवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष पथक बनविण्यात आले आहे.

 

"मुंबई शहरातील काही ठिकाणी विशेष करुन उत्तर मुंबईतील परिसरातील काही जागा अमली पदार्थ विरोधी पथकाच्या रडारवर आहेत. ३१ डिसेंबरच्या रात्री करण्यात येणाऱ्या पार्ट्यांमध्ये रेव पार्टीचे आयोजन केले जाऊ शकते आणि याच कारणास्तव अमली पदार्थ विरोधी पथकाच्या ५ युनिटच्या माध्यमातून ७ टिम बनविण्यात आल्या आहेत. अमली पदार्थ तस्करांचा विरोधात सध्या कारवाई सुरू करण्यात आली आहे." असे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी सांगितले आहे.

 
मुंबईसारख्या शहरात अमली पदार्थांची मागणी पाहता अमली पदार्थ पुरविणाऱ्या तस्करांच्या विरोधात अधिक कडक कारवाई करण्यात येत आहे. या बरोबरच अन्न व औषध प्रधासान, उत्पादन शुल्क, आणि स्थानिक पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@