‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ सिनेमा वादात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Dec-2018
Total Views |

 


 
 
 
भोपाळ : ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. “कोणत्याही सिनेमागृहात हा सिनेमा दाखविण्यात आला, तर होणाऱ्या नुकसानाला सिनेमागृहाचे मालक जबाबदार असतील.” असा धमकीवजा इशारा काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
 

मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष विपीन वानखेडे यांनी हा इशारा दिला आहे. ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या सिनेमाचा ट्रेलर आपल्या फेसबुक अकाऊंटवरून विपीन वानखेडे यांनी पोस्ट केला. हा सिनेमा कोणत्याही सिनेमागृहात दाखविला जाऊ नये. असा इशारा त्यांनी दिली आहे.

 

मध्य प्रदेशमधील भाजपचे प्रवक्ते उमेश शर्मा यांनी या मुद्द्यावरून काँग्रेसवर खडसून टीका केली आहे. नुकतीच राज्यात काँग्रेसची सत्ता आली असताना काँग्रेसचे विद्यार्थी आघाडीचे नेते लोकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत आहेत. समाजात अराजकता पसरवत आहेत. अशी टीका उमेश शर्मा यांनी केली असून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यामध्ये ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा सिनेमा दाखविणाऱ्या सर्व सिनेमागृहांना संरक्षण द्यावे. अशी मागणी उमेश शर्मा यांनी केली आहे. ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा सिनेमा पुढील वर्षी 11 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. हा सिनेमा दाखवून काँग्रेसच्या विरोधात भाजप अपप्रचार करत असल्याचा आरोप काँग्रेसने यापूर्वीदेखील केला आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


 
 
 
@@AUTHORINFO_V1@@