भारतीय खेळाडूंनी मोडले 'हे' रेकॉर्डस्

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Dec-2018
Total Views |



मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये भारत विजयापासून दुर नाही. अशामध्ये तिसऱ्या कसोटीमध्ये भारतीय खेळाडूंनी अनेक जुने रेकॉर्डस् मोडीत काढले.

 

कसोटीत अशी कामगिरी करणारा शमी केवळ ५वा गोलंदाज

 

पहिल्या डावात मोहम्मद शमीने पॅट कमिन्सला बाद करताच त्याच्या नावावर विदेशात १०० गडी बाद करण्याचा नवीन पराक्रम झाला. भारताकडून कपिल देव यांनी विदेशात सर्वात प्रथम १०० गडी बाद केले होते. तसेच त्यांच्या नावावर भारतीय गोलंदाजात विदेशात सर्वात जास्त गडी बाद करण्याचा विक्रम आहे. मोहम्मद शमीने पॅट कमिन्सला बाद करताच तो विदेशात १०० गडी बाद करण्याचा यादीत सामिल झाला. भारताकडून अशी कामगिरी करणारा तो केवळ ५ वा गोलंदाज ठरला आहे. शमीने विदेशात २८ कसोटीत १०० गडी तर, भारतात ११ कसोटी सामन्यात ४० गडी बाद केले आहेत.

 

जस्मित बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी तोंडाला ३४ वर्ष जुना विक्रम

 

१९८४ साली वेस्ट इंडिजच्या मायकल होल्डिंग, मॅल्कम मार्श आणि जोएल गार्नर या तीन वेगवान गोलंदाजांनी एकत्रितपणे वर्षभरात १३० गडी बाद केले होते. आतापर्यंत एकाही देशातील तीन गोलंदाजांना वर्षभरात १३० विकेट घेता आल्या नाहीत. परंतु, ३४ वर्षानंतर भारताच्या जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शामी या तीन वेगवान गोलंदाजांनी ही किमया साधली आहे. एका वर्षात १३१ विकेट घेऊन त्यांनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा विक्रम मोडीत काढला आहे. जसप्रीत बुमराहने ९ कसोटीत ४६ गडी बाद केले आहेत. तर मोहम्मद शामीने १२ कसोटीत ४६ विकेट घेतल्या आहेत. इशांत शर्माने ११ कसोटी सामन्यात ३९ विकेट घेतल्या आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@