मुंबईतील अग्नितांडवात वर्षभरात ४३ जणांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Dec-2018
Total Views |


 

मुंबई - शहरात गेल्या दहा वर्षात लागलेल्या आगीत तब्बल ६०९ जणांचा मृत्यू झाला. तर २०१८ मध्ये आगीमुळे मुंबईत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आग लागण्याच्या घटना व त्यामुळे होणारे मृत्यू रोखण्यात महापालिकेला व अग्निशमन दलाचे प्रशासन अपयशी ठरले, अशी टीका स्थानिकांकडून केली जात आहे. त्यामुळेच शहरात लागलेल्या आगींची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी नगरसेवकांकडून केली जात आहे.

 

मागीलवर्षी डिसेंबर महिन्यात साकीनाका येथील भानू फरसाण मार्ट या कारखान्याला आग लागली. या आगीत १२ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दहाचा दिवसात कमला मिलमधील वन अबव्ह आणि मोजोस ब्रिस्टो या पबला मध्यरात्री आग लागली होती. यात १४ जणांचा मृत्यू झाला. भानू फरसाण आणि कमला मिलपासून झालेले आगीचे सत्र मुंबईत सुरूच आहे. मुंबईत २००८ पासून जुलै २०१८ पर्यंत ४८ हजार ४३४ आग लागण्याच्या घटना घडल्या. त्यात एकूण ६०९ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

मुंबईत जानेवारी ते २७ डिसेंबर दरम्यान मुंबई अग्निशमन दलाकडे ३७२२ विविध घटनांची नोंद झाली आहे. या घटनांमध्ये तब्बल ३६४ जण जखमी झाले असून ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षभरात लागलेल्या आगीमध्ये ऑगस्टमध्ये क्रिस्टल टॉवरमध्ये लागलेल्या आगीत ४ जणांचा, डिसेंबर महिन्यात अंधेरी कामगार रुग्णालयामध्ये लागलेल्या आगीत ११ जणांचा, तर चेंबूर टिळक नगर येथील सरगम इमारतीला लागलेल्या आगीमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला. सर्वात जास्त आगी या गगनचुंबी इमारतीमध्ये लागल्या आहेत. आगी लागण्याच्या घटनांमध्ये सर्वात जास्त प्रमाण हे शॉर्टसर्किटचे असल्याचे अग्निशमन दलाकडून कळवण्यात आले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@