असे निवडा मराठी चॅनल्सचे पॅक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Dec-2018
Total Views |
 

मुंबई : ट्रायने नव्या नियमावलीची अंमलबजावणी करण्यासाठी आता महिन्याभराची मुदत दिली आहे. जुन्या दरप्रणालीतून नव्यामधे हस्तांतरण सुलभतेने व्हावे यासाठी मुदतवाढ दिले असून केबलचे प्लान ३१ जानेवारीपर्यंत कायम राहणार आहेत. ग्राहकांना दरमहा किमान १३० रुपये नेटवर्क कॅपेसिटी फी म्हणून द्यावी लागणार आहे. यात ग्राहकांना फ्री टू एअर असलेले १०० चॅनेल्स मिळणार आहेत. यामध्ये दूरदर्शन, स्टार उत्सव, एबीपी न्यूज आदी चॅनल्सचा सामावेश असणार आहेत.

ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या पेड चॅनेल्समध्ये किमान ५० पैसे तर जास्तीत जास्त १९ रुपये एका चॅनेलसाठी असणार आहेत. शिवाय एखाद्या नेटवर्कची तुम्हाला सगळीच चॅनेल्स हवी असतील तर तो पर्यायसुद्धा ग्राहकांसाठी खुला असणार आहे.

 

मराठी प्रेक्षकांनाही असाच पर्याय उपलब्ध आहे.

 

ü झी मराठी १९ रुपये + १८ टक्के जीएसटी = एकूण २२.४२ रुपये

ü झी मराठी HD १९ रुपये + १८ टक्के जीएसटी = एकूण २२.४२ रुपये

ü झी युवा १० रुपये + १८ टक्के जीएसटी = एकूण ११.८० रुपये

ü झी टॉकीज १७ रुपये + १८ टक्के जीएसटी = एकूण २०.०६ रुपये

ü झी टॉकीज HD १९ रुपये + १८ टक्के जीएसटी = एकूण २२.४२ रुपये

ü कलर्स मराठी १५ रुपये + १८ टक्के जीएसटी = एकूण १७.७० रुपये

ü कलर्स मराठी HD १९ रुपये + १८ टक्के जीएसटी = एकूण २२.४२ रुपये

ü सोनी मराठी रुपये + १८ टक्के जीएसटी = .७२ रुपये

ü स्टार प्रवाह रुपये + १८ टक्के जीएसटी = १०.६२ रुपये

ü स्टार प्रवाह HD १५ रुपये + १८ टक्के जीएसटी = १७.७० रुपये

ü एबीपी माझा ५० पैसे + १८ टक्के जीएसटी = एकूण ५९ पैसे

ü न्यूज 18 लोकमत ५० पैसे + १८ टक्के जीएसटी = एकूण ५९ पैसे

ü झी २४ तास ५० पैसे + १८ टक्के जीएसटी = एकूण ५९ पैसे 

 
 

   त्यामुळे हे सर्व चॅनल्स तुम्हाला हवे असतील तर एकूण १७४.५९ रुपये अधिक १३० असे ३०५ रुपये तुम्हाला केबल ऑपरेटरला द्वावे लातील. याशिवाय तुम्हाला अन्य चॅनल्स स्वातंत्र्यपणे निवडण्याचा अधिकार आहे.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

 
@@AUTHORINFO_V1@@