ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरण : “मनमोहन सिंह यांच्यावर पक्षनेतृत्वाचा दबाव”; मिशेलकडे सापडली चिठ्ठी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Dec-2018
Total Views |
 
 

नवी दिल्ली :  तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर पक्ष नेतृत्वाचा दबाव असल्याचा खुलासा ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणातून पुढे आला आहे. ख्रिश्चियन मिशेल यांच्या अटकेनंतर आता कॉंग्रेसची डोकेदुखी वाढत चालली आहे. फिनमेकॅनिका कंपनीचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष जुसेपी ओरसी यांना लिहिण्यात आले आहे.

 

२८ ऑगस्ट २००९ रोजी लिहिलेल्या चिठ्ठीवर मिशेलला ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणातील सर्व माहिती पंतप्रधान कार्यालय, संरक्षण मंत्रालयासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळत होती. मनमोहन सिंह आणि अमेरिकेच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांच्या भेटीबद्दल माहीतीही त्याला मिळत होती. ओरसी यांना लिहिलेल्या चिठ्ठीनुसार, ऑगस्टा वेस्टलॅण्ड करारानुसार झालेल्या चर्चेबद्दल त्याला माहिती होती. तत्कालीन संरक्षण मंत्री या कराराच्या बाजूने होते, असा दावाही मिशेलने या चिठ्ठीत केला आहे.

 

ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणातील आरोपी ख्रिश्चियन मिशेलचे डिसेंबर रोजी भारतात प्रत्यार्पण करण्यात आले होते. हजार कोटींच्या हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात भारतीय तपास यंत्रणांच्या यादीवर त्याचे नाव होते. गेल्या महिन्यातच मिशेलच्या प्रत्य़ार्पणासाठी परवानगी मिळाली होती. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी युएईमध्ये समकक्ष अब्दुल्ला बिन जायद यांच्याशी अबुधाबी येथे चर्चा करून सीबीआय आणि ईडीकडून केरण्यात आलेल्या चौकशीच्या आधारे भारताने मिशेलच्या प्रत्यार्पणासाठी औपचारिक स्वरुपात विनंती केली होती. ईडीने मिशेलविरुद्ध जून २०१६ मध्ये दाखल आपल्या आरोपपत्रात म्हटले होते की, मिशेलला ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात २२५ कोटी रुपये मिळाले. या आरोपपत्रानुसार, ही रक्कम म्हणजे कंपनीकडून दिलेली लाच होती.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

 
@@AUTHORINFO_V1@@