मुंबईत शंभर किलोचे अंमली पदार्थ जप्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Dec-2018
Total Views |


मुंबई : अंधेरी वाकोला परिसरात अंमली पदार्थविरोधी पथकाच्या आझाद मैदान युनिटने १०० किलो फेंटांनिल जप्त केले असून त्याची किंमत जवळपास हजार कोटी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत भारतातील ही सर्वात मोठी कारवाई असून यात चौघांना अटक करण्यात आली आहे.

 

कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले अंमली पदार्थ मुंबईतून मेक्सिकोला पाठवण्यात येणार होते. त्यापूर्वी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सलीम ढाला (५२), चांद्रमानी तिवारी (४१), संदीप तिवारी (३८), धनंजय सरोज (४१), शी या अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

 

फेंटांनील हे अंमली पदार्थ वेदनाशामक आणि भूल देण्याच्या औषधांमध्ये वापरले जाते. मात्र, फेंटांनील या अंमली पदार्थाचे .०१ ग्राम सेवन सुद्धा व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरू शकते. फेंटांनिल नावाचे अंमली पदार्थ भारतात १२ कोटी प्रतिकिलो या दराने विकले जाते. फेंटांनील अंमली पदार्थ कोकेन पेक्षा जास्त नशा देते तर मोरफिन या अंमली पदार्थांपेक्षा १०० टक्के अधिक नशा देत असल्याने आंतराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी असल्याचे असल्याची माहिती संबंधित तपास अधिकारी शिवदीप लांडे यांनी दिली.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
 
@@AUTHORINFO_V1@@