नदीला मातेचा दर्जा, मात्र तिच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होते : वासुदेव कामत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Dec-2018
Total Views |



नाशिक : “आपण भारतीय लोक नदीला मातेचा दर्जा देतो. तिला आई मानतो, तरीही तिची स्वच्छता असावी यासाठी आपण प्रयत्न करत नाही, याची मोठी खंत वाटते,” असे प्रतिपादन ‘संस्कार भारती’चे अखिल भारतीय अध्यक्ष वासुदेव कामत यांनी केले. ते संस्कार भारती व आयजीएनसीए यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘गोदास्पंदन गोदास्पंदन’ कार्यक्रमातील चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी ‘आयजीएनसी’चे अधिकारी ले. कर्नल रांगणेकर, ‘संस्कार भारती’चे संस्थापक सदस्य योगेंद्रजी बाबा, महानगर अध्यक्षा स्वाती राजवाडे, शिल्पकार सी. एल. कुलकर्णी, संस्कार भारतीचे अखिल भारतीय सहकोषप्रमुख रवींद्र बेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, दि. २८ डिसेंबर रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन येथील महात्मा फुले कलादालनात संपन्न झाले.

 

यावेळी बोलताना कामत म्हणाले की, “नदीबद्दल सगळेच आपले मत व्यक्त करत असतात, पण जसे बोलतात तसे आचरण होताना होताना दिसत नाही, तसे आचरण होणे हे आवश्यक आहे.” नदीबद्दल, तिच्या स्वच्छतेबद्दल तिच्या उगमस्थानापासूनच जनजागृती व्हावी, या उद्देशानेच उगमस्थानीच या आयोजनाचा शुभारंभ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी सी. एल कुलकर्णी म्हणाले की, “या प्रदर्शनाच्या माध्यमातून शहराची, कलेची आणि नदीची प्राचीनता यांचे संगोपन आपण कसे करतो याची मांडणी करण्यात आली आहे.” तर योगेंद्रबाबा म्हणाले की, “नदीचा महिमा हा अपरंपार आहे. गोदावरीचा प्रवास हा खूप मोठा आणि समृद्ध करणारा आहे. नद्यांना त्यांचे पावित्र्य पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी असे कार्यक्रम आवश्यक आहे.” यावेळी रांगणेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास चित्रकार सावंत बंधू, आयजीएनसीचे उपसचिव बी. बी. शर्मा, अभय मिश्रा यांसह मोठ्या संख्येने नाशिककर उपस्थित होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@