नक्षली चळवळीतील पाच जणांना जामीन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Dec-2018
Total Views |
 
 

मुंबई : विविध नक्षलवादी चळवळीशी संबंध, नक्षली विचारधारेचा प्रसार, त्याद्वारे तरुणांना या चळवळीच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न आदी आरोप असणाऱ्या पाच जणांना विशेष सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अजय दत्री ऊर्फ कृष्णा ऊर्फ वेणुगोपालन, सत्यनारायण राजाजिया कारिया, नरसिया लष्कमिया झुमुपाला, शंकर लिंग्गया झुंडे आणि रवी राज्जना मरामपल्ली, अशी त्यांची नावे आहेत.

 

त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या सत्र न्यायालयाचा आदेश उच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला आहे. नियोजित वेळेत आरोपपत्र दाखल झाले नसल्याने हे पाचही जण जामिनास पात्र ठरले आहेत.सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. देशमुख यांनी हे निरिक्षण नोंदवले आहे. त्यांनी प्रत्येकाला वैयक्तिक ५० हजार रुपये आणि एक किंवा दोन खात्रीदायक हमीदार या अटींवर हा जामिन मंजूर करण्यात आला आहे.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@