दापोली खेड मार्गावर अपघातात पाच ठार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Dec-2018
Total Views |
 
 

दापोली : दापोली-खेड महामार्गावर शुक्रवारी सकाळी डंपर आणि प्रवासी वाहनाच्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही वाहने इतकी वेगात होती, की यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर जखमींचा आकडा त्याहून जास्त आहे. जखमींवर तातडीने उपचार करण्यासाठी नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती संबधितांनी दिली आहे.

 

प्रवासी वाहनाचा चालक त्याच्या प्रवासी वाहनातून दापोलीहून खेडच्या दिशेने येत होता. यावेळी इथल्या इंद्रधनू बागेनजीक आल्यावर ओव्हरटेक करताना हा अपघात झाला. यात मधुकर गंगाराम कांबळे, जगदीश पारदुले, महमिदा शेख यांच्यासह अन्य दोघेजण ठार झाले. निलेश पवार आणि संदीप पावसकर हे यात जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@