मतदान करण्यासाठी शिवसेनेचाच फोन : छिंदम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Dec-2018
Total Views |
 
 

अहमदनगर : अहमदनगरमध्ये महापौरपदाच्या निवडणूकीतील वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. श्रीपाद छिंदमने शिवसेना उमेदवार बोराटे यांना मतदान केल्याने त्याला मारहाण करण्यात आली आहे. मात्र, शिवसेनेचे उमेदवार बोराटे यांनी विनंती केल्यामुळेच त्यांना मतदान केल्याचा दावा छिंदम यांने केला आहे.

 

अहमदनगर महापालिका महापौर निवडणूकीला नवे वळण मिळाले आहे. शिवसेनेकडून फोन आल्याचा दावा करत श्रीपाद छिंदमने माध्यमांसमोर एक ऑडिओ क्लीपही सादर केली आहे. मात्र, ही क्लीप बनावट असल्याचे बोराटे यांनी सांगितले आहे.

 

शिवसेनेला बदनाम करण्यासाठी छिंदम तसे करत असल्याचा आरोपही केला जात आहे. छिंदमला सभागृहात झालेल्या मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा आदेश पीठासन अधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला आहे. त्यानुसार गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू केले आहे.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@