पाच नगरपरिषदांसाठी २७ जानेवारीला मतदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Dec-2018
Total Views |
 
 

मुंबई : कर्जत (जि. रायगड), मलकापूर (जि. सातारा), श्रीगोंदा (जि. अहमदनगर), आरमोरी (जि. गडचिरोली) या नगरपरिषदा महादुला (जि. नागपूर) नगरपंचायतीच्या सार्वत्रिक; तसेच विविध नगरपरिषदा नगरपंचायतींमधील ११ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २७ जानेवारी रोजी मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त . . सहारिया यांनी दिली.

सहारिया म्हणाले की, ते जानेवारी या कालावधीत नामनिर्देशनपत्र स्वीकारली जातील. नामनिर्देशनपत्रांची १० जानेवारी रोजी छाननी होईल. मतदान २७ जानेवारी रोजी सकाळी .३० ते सायंकाळी .३० या वेळेत होईल. मतमोजणी २८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल.

पोटनिवडणूक नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय जागा

· राजापूर (जि.रत्नागिरी)-६अ,

· आळंदी(पुणे)-९अ,

· फलटण (सातारा) १२ अ

· दुधनी (सोलापूर)- २ब,

· पन्हाळा (कोल्हापूर)- ८क,

· दिंडोरी (नाशिक)-१५,

· यावल(जळगाव)- १अ,

· बीड- ११अ,

· बुलढाणा- १२ब,

· अर्जुनी (गोंदिया)-१४,

· गोरेगाव (गोंदिया)- १४


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@