अबब ! १५ चेंडूत घेतले ६ बळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Dec-2018
Total Views |



क्राइस्टचर्च - न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात श्रीलंकेवर १०४ धावांवर सर्वबाद होण्याची नामुष्की ओढवली. ट्रेंट बोल्ट आणि टिम साउदीच्या अचूक आणि भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेचा पूर्ण संघ अक्षरक्ष: पत्त्यांच्या खेळाप्रमाणे मैदानावर कोसळला. बोल्टने अवघ्या १५ चेंडूत ६ विकेट गारद केले तर टिम साउथीने ३ गडी माघारी धाडत श्रीलंकेची दाणादाण उडवली.

 

विशेष म्हणजे या सामन्यात न्यूझीलंडकडून फक्त या ४ गोलंदाजांनीच गोलंदाजी करत अवघ्या ४१ षटकांमध्ये श्रीलंकेचा डाव गुंडाळला. या सामन्यात श्रीलंकेचा अखेरचे ६ फलंदाज हे एकट्या बोल्टनेच माघारी धाडलेत. तर ४ लंकन फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना १७८ धावा केल्या होत्या. त्यानंतर श्रीलंकेला मोठी धावसंख्या उभारुन आघाडी घेण्याची संधी होती. मात्र त्यात अपयशी ठरले. न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसअखेर २ विकेट गमावत २३१ धावा केल्या आहेत. या सामन्यात न्यूझीलंडला ३०५ धावांची मोठी आघाडी मिळाली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@