किरण तारे यांना 'दर्पण सेवा गौरव पुरस्कार' जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Dec-2018
Total Views |



अहमदपूर : ज्येष्ठ पत्रकार किरण तारे यांना साहित्य संगीत कला अकादमीच्या वतीने दिला जाणारा यंदाचा 'दर्पण सेवा गौरव राज्य पुरस्कार २०१८' जाहीर झाला आहे तर स्थानिक पातळीवर पत्रकार म्हणून कार्यरत असणारे सुरेश डबीर (पत्रकार दै. तरुण भारत, अहमदपूर) व सुधाकर हेमनर (पत्रकार दै. सामना, चाकूर) यांना साहित्य संगीत कला अकादमीच्या वतीने 'दर्पण जीवन गौरव पुरस्कार २०१८' देऊन गौरव करण्यात येणार आहे.

 

साहित्य संगीत कला अकादमी (महाराष्ट्र) अहमदपूर जि. लातूरच्या वतीने प्रत्येक वर्षी पत्रकारिता क्षेत्रात राज्यस्तरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस 'दर्पण सेवा गौरव पुरस्कार' दिला जातो. शाल-स्मृतिचिन्ह, लेखणी, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पूर्वी जयप्रकाश दगडे (लातूर), राही भिडे (मुंबई), राजा माने (सोलापूर), अशोक सुरवसे (मुंबई), अतुल कुलकर्णी (मुंबई) आदींना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच अहमदपूर व चाकूर तालुक्यात पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या दोन पत्रकारांची प्रत्येक वर्षी पुरस्कार निवड समितीच्या वतीने निवड करण्यात येते.

 

यंदा ज्येष्ठ पत्रकार सुरेश डबीर (दै. तरुण भारत, अहमदपूर ) व सुधाकर हेमनर ( पत्रकार, दै. सामना, चाकूर) यांना 'दर्पण जीवन गौरव पुरस्कार' देण्यात येणार आहे. शाल- स्मृतिचिन्ह- मानपत्र, पुष्पहार असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी हा पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार मा. रा. कराड,प्रा. एस. एम. कुलकर्णी, अ. ना. शिंदे, उदयकुमार जोशी, संदीप अंकलकोटे, बाबूराव श्रीमंगले, रविकांत क्षेत्रपाळे, प्रशांत शेटे यांना प्रदान करण्यात आला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@