भारताने रचला धावांचा डोंगर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Dec-2018
Total Views |



मेलबर्न : दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने उत्तम सांघिक कामगिरीचा नमुना दिला. मधल्या फळीच्या कामगिरीमुळे भारताने ४४३ धावांची मजल मारत डाव घोषित केला. यामध्ये चेतेश्वर पुजाराचे शतक तसेच मयांक अगरवाल, विराट कोहली आणि रोहित शर्माच्या अर्धशतकांचा समावेश आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलिया बिनबाद ८ धाव केल्या होत्या.

 

भारतीय कसोटी संघाचा कणा म्हणुन ओळख असलेल्या चेतेश्वर पुजाराने २८० चेंडूत शानदार शतक साजरे करत दुसऱ्या दिवशी चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र कर्णधार विराट कोहली ८२ धावांवर बाद झाल्यानंतर त्यापाठोपाठ पुजाराही १०६ धावांवर माघारी परतला. त्यानंतर पुनरागमन करणाऱ्या रोहित शर्माने कसोटीमधले १०वे अर्धशतक साजरे केले. तो ६३वर नाबाद राहिला. त्याने अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत या दोघांसोबत अर्धशतकी भागीदारी केली. यांच्या बळावर भारताला ४४३ धवांपर्यंत डोंगर रचला.

 

शतकवीर पुजाराने केलेली संयमी खेळी आणि त्याला विराट कोहलीची मिळालेली सुयोग्य साथ यामुळे भारताला दुसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या उभारता आली. त्यांनी १७० धावांची भागीदारी केली. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने आपला डाव ४४३ धावांवर घोषीत केल्यानंतर मैदानात फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद ८ धावा केल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मार्कस हॅरिस ५ तर ऍरोन फिंच ३ धावांवर खेळत होते. यजमान ऑस्ट्रेलिया या सामन्यात आता ४३५ धावांनी पिछाडीवर आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@