खातेवाटपावरुन गेहलोत-पायलट आमनेसामने

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Dec-2018
Total Views |



जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलेल्या विनंतीवरुन राज्यपाल कल्याण सिंह यांनी मंत्र्याचे खातवाटप जाहीर केले आहे. मात्र, अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामध्ये खातेवाटपावरून तीव्र मतभेद असल्याचे बोलले जात आहे. अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची खातेवाटपापूर्वी भेट घेऊन चर्चा केली. राज्या मुख्यमंत्र्यांसह ३० मंत्री बनू शकतात. आता हा आकडा २५ च्या घरात गेला असून त्यामुळे पाच जागा अजूनही रिक्त आहेत.

 

 
 
 

खातेवाटपात गेहलोत यांनी पुन्हा एकदा बाजी मारली असून गेहलोत यांनी स्वतःजवळ नऊ खात्यांचा कारभार ठेवला आहे. या अर्थ, गृह, सुचना प्रसारण, निती आयोजना विभाग आदींसारख्या महत्त्वाच्या खात्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर नियोजन, आस्थापन, सामान्य प्रशासन विभाग आणि माहिती आणि तंत्रज्ञान आदी खात्यांचा समावेश आहे.

 
 

 
 

दरम्यान, उप मुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याकडे ग्रामविकास, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कार्मिकी, सार्वजनिक बांधकाम, पंचायत राज आदी खात्यांचा कारभार दिला आहे. गेहलोत यांच्या मंत्रीमंडळात १३ कॅबिनेट आणि १० राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. सोमवारी झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर खातेवाटप करण्यात आले. मंत्रीमंडळात १८ नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

 

 
 

मंत्रीमंडळ विस्तारामध्ये मातब्बर नेत्यांना वगळण्यात आले आहे. यासीपी जोशी, हेमाराम चौधरी, दीपेंद्र सिंह शेखावत, परशराम मोरदिया, राजेंद्र पारीक आदी नेते आहेत. मंत्रीपद हुकल्याने सी. पी. जोशी, दीपेंद्र सिंह शेखावत शपथविधी सोहळ्याला उपस्थितच नव्हते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@