मुळा-मुठा नदी म्हणतेय #MeToo

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Dec-2018
Total Views |



पुणे : मागील काही दिवसांपासून देशभरात चर्चेत असलेल्या #MeToo मोहिमेचा आधार घेत पुण्याच्या मुळा-मुठा नदी पात्रात झळकत असलेला एक फलक सध्या पुणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे. या नद्यांची सध्याची अवस्था पाहता तिच्यावर माणसांकडून कशाप्रकारे अत्याचार केले जात आहेत, हे या फलकाद्वारे मांडण्यात आले आहे. #MeToo मोहिमेचा आधार घेत पुण्यातील 'माय लॉयर पुणे' या संघटनेने ओंकारेश्वर पुलावर हे अनोखे फलक लावले आहेत. या फलकातून मुळा-मुठा नदीवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला आहे.

 

मुळा-मुठा नद्यांना सद्यस्थितीत गटाराचे स्वरूप आले आहे. "#MeToo गेली कित्येक दिवस हे माझ्या संमतीशिवाय होत आलय, कधी माझ्या गर्भातून वाळू उपसा, तर कधी घराघरातील सांडपाणी, कधी निर्माल्याच्या रुपात कचरा तर कधी असभ्य, असंस्कृताची मनमानी हो, मी पीडित आहे." या शब्दात फलकाद्वारे नदीच्या भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. शिवाय या फलकावर नदी अथवा कोणतेही सार्वजनिक जलप्रवाह प्रदूषण करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता कलम २७७च्या अंतर्गत ३ महिने कारावास, दंड किंवा दोन्ही या कलमास पात्र राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@