अॅपलमुळे भारतात २५ हजार रोजगाराच्या संधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Dec-2018
Total Views |


नवी दिल्ली :  जगातील आघाडीची मोबाईल कंपनी अॅपल इन्कोर्पोरेशन त्यांच्या फोक्सोकॉन या युनिटच्या भागिदारीसह २०१९मध्ये आयफोन एक्सची जोडणी भारतात केली जाणार आहे. तैवानची कंत्राटदार निर्माती कंपनी लवकरच भारतात आयफोन्सच्या सुट्या भागांची जोडणीचे काम सुरू करणार आहे. त्यासाठी २५ हजार कामगारांची आवश्यकता भासणार आहे.

 

आयफोनचे सर्वात मोठे उत्पादन असलेल्या आयफोन एक्स सीरीजच्या सुट्या भागांची जोडणी भारतात केली जाणार आहे. एका अहवालानुसार भारतातील व्यवसायिक बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत करून अॅपल इन्कोर्पोरेशनने हा निर्णय घेतला आहे. तमिळनाडूतील श्रीपेरुम्बुदुर येथे ही फॉक्सॉकोनचा प्लान्ट असणार आहे. दरम्यान यासाठी अडीच हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यामुळे थेट २५ हजार रोजगारनिर्मिती होणार असल्याचे म्हटले आहे. फॉक्सॉकोनच्या भारतातील या गुंतवणूकीबद्दल आयफोन प्रवक्त्यांनी या प्रकरणी थेट भाष्य करण्यास नकार दिला आहे. गेल्या महिन्यात आयफोनच्या विक्रीत घट झाल्याने गुंतवणूकदारांनी चिंता व्यक्त केली होती. त्यामुळेच भारतातील बाजारासह आशियातील बाजारपेठेकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी हे पाऊल मानले जात आहे.

 

आयफोन होणार स्वस्त ?

 

यापूर्वी बंगळुरू येथील विस्ट्रर्न कॉर्प या युनिटमध्ये आयफोन ६ ची जोडणी केली जात होती. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आयफोन ६ च्या किमती कमी झाल्या होत्या. आयफोनच्या एक्स सिरिजच्या भारतातील निर्मितीमुळे आता एक्स सिरीजच्या किमती कमी होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान अॅपलने २०१७मध्ये सर्वात महागडा आयफोन एक्स लॉन्च केला होता. त्यानंतर नव्या श्रेणीतील उत्पादन आयफोन एक्स एस आणि आर यांच्या निर्मितीमुळे त्याचे उत्पादन घटवण्यात आले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@