अमेरिकेतील ‘हे’ चर्च बनणार मंदिर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Dec-2018
Total Views |
 

पोर्टसमाऊथ : अमेरिकेतील ३० वर्ष जुने चर्च आता मंदिर बनवण्यात येणार आहे. स्वामीनारायण हिंदू मंदिर बनवण्यासाठी वर्जिनियातील पोर्टसमाऊथ स्थित चर्चची खरेदी करण्यात आली आहे. सर्वात आधी चर्चचे रुपांतर मंदिरात केले जाईल, त्यानंतर येथे प्राणप्रतिष्ठ करण्यात येईल. टीओआईच्या अहवालानुसार हे अमेरिकेतील सहावे आणि जगातील नववे चर्च आहे कि, ज्याचे रुपांतर स्वामीनारायण गडी संस्थानकडून स्वामीनारायण मंदिरामध्ये रुपांतर केले जात आहे.

 

वर्जिनियापूर्वी कॅलिफोर्निया, लुईसविले, पेन्निसिल्वानिया, लॉस एन्जिलिस, ओहियोमध्ये असलेले चर्चचे मंदिरात रुपांतरण करण्यात आले आहे. अशाप्रकारे इंग्लंडमध्ये लंडन, बोल्टन कॅनडामध्ये टोरंटोमध्ये चर्चचे रुपांतर मंदिरात केले आहे. स्वामीनारायण संस्थांनचे महंत भगवतप्रियदास स्वामींनी दिलेल्या माहितीनुसार, संस्थानचे अध्यात्मिक प्रमुख पुरुषोत्तमप्रियदास स्वामी यांच्या नेतृत्वात ३० वर्षे जुन्या चर्चचे रुपांतर मंदिरात केले जाणार आहे.

 

स्वामींनी दिलेल्या माहीतीनुसार, वर्जिनियामध्ये हरिभक्तांसाठी पहिले मंदिर असणार आहे. हे मंदिर बनवण्यासाठी इतक काही बदलण्याची आवश्यकता भासणार नाही. इतर धर्माप्रमाणे आता हे मंदिर अध्यात्मिक जागाच राहणार आहे. वर्जिनियामध्ये १० हजार गुजराती समुदाय राहतो. हे मंदिर चर्च एकर परिसरात १८ हजार चौरस फुटांमध्ये बनले आहे. हे चर्च ११ कोटींना खरेदी करण्यात आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@