पदार्पणात मयांकने केले 'हे' विक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Dec-2018
Total Views |


 


मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ४ सामन्यांची बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका चालू आहे. या मालिकेतील तिसरा सामना मेलबर्न येथे खेळण्यात येत असून भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताकडून पदार्पण करणाऱ्या मयांक अगरवालने दोन खास विक्रम आपल्या नावे केले आहेत.

 

ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर पदार्पणातच केले अर्धशतक

 

या सामन्यात भारताकडून पदार्पण करणाऱ्या मयंक अगरवालने एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे. भारताकडून सलामीला आलेल्या मयांक अगरवालने पहिल्या डावात १६१ चेंडूचा सामना करताना ७६ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याने केलेल्या झुंजार खेळीमुळे एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणात ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर अर्धशतक करणारा भारताचा दुसरा तर सर्वाधिक धावा करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. या आधी १९४७ मध्ये दत्तू फाडकर यांनी हा कारनामा केला होता. त्यांनी सिडनी क्रिकेट मैदानावर ५१ धावांची खेळी केली होती.

 

सलामीवीर म्हणून कसोटी पदार्पणात अर्धशतक करणारा भारताचा सातवा फलंदाज

 

कसोटीत पदार्पण करताना ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारा मयंक हा भारताचा सातवा फलंदाज ठरला आहे. सलामी फलंदाज म्हणून पदार्पणात सर्वाधिक धावा करण्याचा मान शिखर धवनच्या नावावर आहे. त्याने २०१३मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८७ धावांची खेळी केली होती. तर ७६ धावांसह मयंक अगरवाल चौथ्या स्थानावर आहे.

 

पदार्पणातील पहिल्या डावात ५० पेक्षा जास्त धावा करणारे भारताचे सलामीवीर

 

१८७ धावा - शिखर धवन ( २०१३)

१३४ धावा - पृथ्वी शॉ (२०१८)

८५ धावा - केसी इब्राहिम (१९४८)

७६ धावा - मयंक अगरवाल (२०१८)

६५ धावा - सुनील गावसकर (१९७१)

६३ धावा - अरुण लाल (१९८२)

५९ धावा - दिलवर हुसेन (१९३४)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@