मालेगाव मनपा आयुक्तपदावर किशोर बोर्डे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Dec-2018
Total Views |


नाशिक : नाशिक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्ड यांची मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदावर पुन्हा एकदा नियुक्ती झाली आहे. आयुक्त संगीता धायगुडे यांची विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात प्रादेशिक उपसंचालकपदी बदली झाल्यामुळे हे पद रिक्त होते. नूतन आयुक्त नियुक्तीवरुन राजकीय मतभेद होते. सत्ताधारी गटाकडून बोर्डे यांच्या नावाची शिफारस झाली होती, असा दावा भाजपने केला होता.

 

औरंगाबाद महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या नावाची चर्चा पुढे आली होती. त्यातून निर्माण झालेल्या कुतूहाला पूर्णविराम मिळाला आहे. बोर्डे यांची अखेर नियुक्ती झाली, नगरविकास विभागाचे उपसचिव कैलास बधान यांनी तसे आदेश काढले आहेत. यापूर्वी सप्टेंबर २०१५ ते एप्रिल २०१६ या कालावधीत मालेगाव महापालिका आयुक्त पदावर कार्यरत होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@