घसरणीनंतर शेअर बाजार सावराला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Dec-2018
Total Views |
 
 

मुंबई : सकाळच्या सत्रात घसरणीसह खुला झालेला भांडवली बाजार बॅंकींग, ऑटो, आणि एफएमसीजी सेक्टरमध्ये चौफेर विक्री झाल्याने घसरण सावरत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स दिवसअखेर १७९.७९ अंशांनी वधारत ३५ हजार ६४९ च्या स्तरावर पोहोचला.

 

सकाळच्या सत्रापासून १ वाजून ४५ मिनिटांपर्यंत घसरण सुरूच होती. सेन्सेक्स ३५ हजार ७०४च्या स्तरावर जाऊन आला. निफ्टीमध्येही ६६ अंशांनी वाढ होत १० हजार ७२६च्या स्तरावर बंद झाला. निफ्टीमध्ये ३६ कंपन्यांमध्ये खरेदी दिसून आली तर उर्वरित १४ कंपन्याच्या शेअरमध्ये विक्री झाली. निफ्टीमध्ये अदानी पोर्टसमध्ये सर्वाधिक ४.५३ टक्के वधारले. सनफार्मामध्ये २.३४ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. सेन्सेक्समध्ये जेट एअरवेज, केन फिन होम्स लिमिटेड, आयएलएफएस, स्पाईसजेट आदी शेअर वधारले.

 

दरम्यान कच्च्या तेलातील दरांची घसरण झाली असली तरीही पेट्रोल डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत पेट्रोलची किंमत ७५.४१ रुपये तर डिझेल ६६.७९ रुपये प्रतिलिटर आहे. दरम्यान पेट्रोल डिझेलच्या दरांनी वर्षभरातील निचांग गाठला. १ जानेवारी २०१८ रोजी पेट्रोल ७७.८७ रुपये इतका होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@