तिसऱ्या कसोटीत 'या' खेळाडूंचा संघात सामावेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Dec-2018
Total Views |
 

मेलबर्न : भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. यात मुरली विजय आणि लोकेश राहुलला सातत्याने अपयशी ठरल्याने डच्चू देण्यात आला आहे. आर. अश्विन दुखापतीतून सावरला नसल्याने त्याला संघात जागा मिळालेली नाही. कर्नाटकचा फलंदाज मयंक अगरवाल हा तिसऱ्या सामन्यातून कसोटी पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

 

विजय व राहुलला वगळल्यामुळे मयंक अगरवालसह हनुमा विहारी सलामीला उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसऱ्या कसोटीत उमेश यादवला काढून रवींद्र जडेजाला संधी दिली आहे. दुखापतीतून सावरलेल्या रोहित शर्माला पुन्हा संघात स्थान देण्यात आले. अॅडलेडमधील पहिल्या कसोटी सामन्यातील विजयानंतर खराब फलंदाजी व चार वेगवाग गोलंदाज खेळवण्याचा डाव उलटल्यामुळे पर्थमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यातून धडा घेत आता उमेश यादव ऐवजी रवींद्र जडेजाला मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.

 

भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अगरवाल, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रित बुमराह.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@