आता चलनात येणार ही नवी नोट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Dec-2018
Total Views |
 
 

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) लवकरच नवीन वैशिष्ट्यांसह २० रूपयांची नवी नोट चलनात आणण्याबाबत विचार सुरू केला आहे. आरबीआयने मंगळवारी ही माहीती जाहीर केली आहे. नोटाबंदीनंतर दोन हजारची नवी नोट चलनात आली होती.

 

त्यानंतर टप्प्याटप्प्यात १०, ५०, १०० आणि ५०० रूपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या आहेत. नोव्हेंबर २०१६पासून नव्या रूपात महात्मा गांधी मालिकेअंतर्गत या नोटा जारी करण्यात येत आहे. ही नोट आधीच्या नोटेपेक्षा तुलनेने वेगळा आकार आणि अभिकल्पात आहे.

 

रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च २०१६ पर्यंत २० रूपयांच्या नोटांची संख्या ४.९२ अब्ज होती. जी मार्च २०१८ पर्यंत १० अब्ज झाली आहे. या चलनातील नोटांची संख्या सध्या ९.८ टक्के इतकी आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@