मोहम्मद कैफने इम्रान खान यांना सुनावले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Dec-2018
Total Views |
 

नवी दिल्ली : माजी क्रिकेट खेळाडू मोहम्मद कैफने पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांचा चांगलाच समाचार घेत त्यांच्यावर तुफान हल्ला चढवला. इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण अल्पसंख्यांकाशी कसे वागावे, हे शिकवणार असल्याचे वक्तव्य केल्याने कैफने इम्रान यांना खडेबोल सुनावले.

 

कैफने ट्विटरवरून इम्रान खान यांच्यावर टिकास्त्र सोडले, तो म्हणाला, फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानात जवळपास २० टक्के अल्पसंख्यांक होते. आता फक्त ते टक्क्यांवर आहेत. भारतात स्वातंत्र्यानंतर सातत्याने अल्पसंख्यांकांची संख्या वाढत आहे. अल्पसंख्यांकाशी कसे वागावे हे शिकवणाऱ्याच्या यादीत पाकिस्तान शेवटचा देश असावा असा टोलाही त्याने हाणला.

 

लाहोरच्या एका कार्यक्रमात इम्रान खान यांनी पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांना सुरक्षित वाटेल, असा पाकिस्तान घडवणार असल्याचा दावा केला. त्यावेळी त्यांनी हिंदुस्थानच्या पंतप्रधानांवर निशाणा साधला. अल्पसंख्यांकांशी कसे वागावे, हे आम्ही मोदी सरकारला शिकवणार आहोत, असे वक्तव्य त्यांनी केले. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शहा यांनी माझ्या मुलांना भारतात ठेवण्याची भीती वाटत असल्याचे म्हटले. हाच धागा पकडून इम्रान यांनी मोदी सरकारवर टीका केली होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@