अभाविपच्या कोकण प्रदेशाध्यक्षपदी मंदार भानुशे यांची फेरनिवड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Dec-2018
Total Views |

 


 
 
 
मुंबई : वर्ष २०१८-१९ साठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. मंदार भानुशे (मुंबई) यांची तर प्रदेशमंत्री म्हणून अनिकेत ओव्हाळ (मुंबई) यांची पुनर्निवड करण्यात आली. ही निवड निर्वाचन अधिकारी प्रा. डॉ. वरदराज बापट यांनी मुंबई येथे केली. प्रा. मंदार लक्ष्मीकांत भानुशे मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत गणित विषयाचे अध्यापन करतात. गेली १३ वर्षे अध्यापन कार्य करत असून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भानुशे यांनी ४ वर्ष रा. स्व. संघाचे प्रचारक म्हणूनही कार्य केले आहे.
 

भानुशे १९९८ पासून अभाविपचे कार्य करत असून यापूर्वी मुंबई महानगर उपाध्यक्ष व मुंबई महानगर अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. अनिकेत गौतम ओव्हाळ यांनी मुंबई येथील रुईया महाविद्यालयातून एम. एस्सी (आयटी) चे शिक्षण घेतले आहे. २०११ पासून ते अभाविपमध्ये कार्यात सक्रिय आहेत. यापूर्वी त्यांनी पूर्व मुंबई भाग मंत्री, मुंबई महानगर सहमंत्री, मुंबई महानगरमंत्री, कोकण प्रदेश सहमंत्री व प्रदेश विद्यापीठ संयोजक अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. येत्या दि. २७ डिसेंबर रोजी कर्णावती (गुजरात) येथे होणाऱ्या ५३ व्या कोकण प्रदेश अधिवेशनात नवनिर्वाचित अध्यक्ष व मंत्री आपला पदभार स्वीकारतील, असे अभाविपने घोषित केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


 
 
 
@@AUTHORINFO_V1@@