लोगो बनवा आणि जिंका २५ हजारांचे बक्षिस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Dec-2018
Total Views |
 

मुंबई : केंद्रीय वित्तीय शिक्षण केंद्रासाठी (एनएफसीई) लोगो आणि आकर्षक टॅगलाईन तयार करण्याचे आवाहन रिझर्व्ह बॅंकेने केले हे आवाहन केले आहे. निवडलेल्या लोगो व टॅगलाईनसाठी विजेत्याला २५ हजारांचे बक्षीस मिळेल, अशी माहितीही आरबीआयने दिली आहे.

 

केंद्रीय वित्तीय शिक्षण केंद्र ही संस्था वित्तीय नियमन करणाऱ्या आरबीआय, सेबी, आयआरडीए आणि पीएफआरडीए यांच्या सहकार्याने स्थापन झाली. गरीब आणि दुर्बल गटातील लोकांना आर्थिक समावेशकतेमध्ये घेण्यासाठी व आर्थिक साक्षरतेसाठी एनएफसीई कार्यरत आहे.

 

निवडलेल्या लोगोचा वापर हा सोशल मीडिया कँपेन, प्रिंट माध्यम ऑफिस स्टेशनरीमध्ये केला जाणार आहे. नागरिकांना लोगो व टॅगलाईन [email protected] या ई-मेलवर पाठवायचे आहेत. ncfe.org.in या वेबसाईटवर अधिक माहिती उपलब्ध आहे. लोगो व टॅगलाईन पाठविण्याची अंतिम मुदत ३० जानेवारी २०१९ आहे. यापूर्वीही केंद्र सरकारने काही संस्थांचे लोगो नागरिकातूनच मागवून निवडलेल्या लोगोकरिता बक्षीस दिले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@