क्रिकेटच्या मैदानातच तरुणाचा ‘या’ कारणामुळे मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Dec-2018
Total Views |
 
 

मुंबई : क्रिकेटचा सामना सुरू असताना तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना भांडुपमध्ये २३ डिसेंबर रोजी घडली. वैभव केसरकर, असे या मृत तरुणाचे नाव असून सामन्यादरम्यान छातीत दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैभवला हृदयविकाराचा झटका आल्याचे तपासणीतून स्पष्ट झाले. मात्र, उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला.

 

भांडुपमध्ये २३ डिसेंबरला टेनिस क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली होती. गावदेवी पॅकर्स या संघातून वैभव फलंदाजी करत असताना अचानक छातीत दुखू लागल्याने त्याने फलंदाजी सोडली होती. यानंतर क्षेत्ररक्षण करतानाही त्याचे छातीत दुखणे कमी झाले नसल्याने तो मैदानाबाहेर जाऊन बसला. त्यानंतर त्याला भावसार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे त्याचा उपचाराआधीच मृत्यू झाला.

 

वैभव हा टेनिस, क्रिकेट स्पर्धांमध्ये भांडुप तसेच आसपासच्या परिसरात प्रसिद्ध होता. नुकताच तो त्याच्या कुटुंबियांसहीत दिव्याला रहायला गेला होता. क्रिकेटची प्रचंड आवड असल्याने तो सतत भांडुपमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी येत असे. त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबियांसहित मित्रांना धक्का बसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

 

अकाली हृदयविकाराने मृत्यू येणे याला बदलती जीवनशैली कारणीभूत आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कामाचा अतिताण, खाण्याच्या घातक सवयी, व्यायामाचा अभाव यामुळे तरुणांमध्ये हृदयविकार बळावत असल्याचे मत हृदयरोग तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@