म्युच्युअल सही है : वर्षात ३ लाख कोटींची गुंतवणूक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018
Total Views |
 

नवी दिल्ली : भांडवली बाजारात मोठे उतारचढाव असतानाही गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूकीवर विश्वास दाखवत ३ लाख कोटींची गुंतवणूक केली आहे. येत्या काळात ही आणखी वाढ होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाने (एम्फी) दिलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर २०१८मध्ये म्युच्युअल फंडांच्या गंगाजळीत १३ टक्के वाढ होऊन २४ लाख कोटींवर पोहोचल्याचे म्हटले आहे.

 

डिसेंबर २०१७मध्ये ही गंगाजळी २१.२६ लाख कोटी होती. यावर्षी १.३ कोटी नवे गुंतवणूकदार यात सामाविष्ट झाल्याची माहिती एम्फीने दिली आहे. दरम्यान डिसेंबर २०१७ मध्ये गुंतवणूकदारांचा आकडा कमी होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सद्यस्थितीत गुंतवणूकदारांनी इक्विटी फंडांतील गुंतवणूकीतून आखडता हात घेतला आहे.

 

महिंद्र असेट मॅनेजमेंटचे विक्री अध्यक्ष मनीष महेता यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या तिमाहीतील गुंतवणूक गतवर्षीच्या तुलनेत ३२ टक्क्यांनी वाढेल, अशी अपेक्षा आहे. या तिमाहीत नोव्हेंबर २०१७च्या तुलनेत ५.४ लाख कोटींची गुंतवणूकीची वाढ नोंदवण्यात आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@