नाहाटा महाविद्यालयात अध्यात्म, विज्ञान विषयावर कार्यशाळा उत्साहात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018
Total Views |

 
 
भुसावळ : 
 
कला, विज्ञान आणि पु.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ विद्यार्थी विकास विभाग व इस्कॉन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
 
या कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.व्ही.वायकोळे तर उदघाटक म्हणून डॉ. रेखा पाटील , डॉ. सुवर्णा गाडेकर, डॉ.राजेंद्र फिरके, डॉ.मोनिका अग्रवाल, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. एस.के.राठोड उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. पी. ए. अहिरे यांनी केले.
 
डॉ. रेखा पाटील यांनी त्यांच्या व्याख्यानातून अध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे सांगून अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व चांगले कसे बनवता येईल याबाबतही चांगले विचार, आचरण करता येईल असे त्यांनी मार्गदर्शन केले.
 
कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. एम. व्ही.वायकोळे उपस्थित होते . डॉ.पी.ए.अहिरे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला डॉ.आर. एस. नाडेकर, के.पी. पाटील, पुराणिक, प्रा. राजश्री देशमुख, प्रा.कुंदन तावडे, विद्यार्थी विभागाचे व महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
@@AUTHORINFO_V1@@