सी.एम.चषक स्पर्धांमध्ये खेळाडूंचे घवघवीत यश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018
Total Views |

जळगाव : 
 
जिल्ह्यात सुरु असलेल्या सी.एम.चषक स्पर्धेत शहरात विविध ठिकाणी आयोजित स्पर्धांमध्ये भाग घेवून खेळाडूंनी शनिवारी यश संपादन केले.
 
एकलव्य क्रीडा संकुल मैदानावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अंतिम सामन्याचे नाणेफेक करण्यात आले. यावेळी त्यांनी फलंदाजीचा आनंद देखील लुटला.
 
यावेळी आ.सुरेश भोळे, माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवानी, स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, क्रीडा आघाडी अध्यक्ष राजू खेडकर, महेश पाटील, हर्षल नेवे, भूपेश कुलकर्णी, जितेंद्र चौथे, आनंद सपकाळे, विक्की सोनार, जुगल लुल्ला, नगरसेवक मयूर कापसे, स्नेहा निंभोरे, स्वप्निल सोनवणे, अजय जोशी, नामदेव हटकर, डॉ. विरेंद्र खडके, उपस्थित होते.
 
अंतिम सामन्यात एल.सी.बी. संघाने सिक्वाल संघाचा 9 गडी राखून पराभव केला. उपविजयी संघातर्फे रफिक ने 23 तर विजयी संघातर्फे अमोल धांडे याने 19 धावांचे योगदान दिले. आनंद फाउंडेशनचा संघ तिसर्‍या स्थानी राहीला.
 
 
जिल्हा क्रीडा संकुल येथे खो-खो स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक विशाल त्रिपाठी, उपाध्यक्ष नितीन इंगळे, नगरसेवक महेश चौधरी, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष तथा स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, भूपेश कुलकर्णी, हेमंत भंगाळे, रमेश मौर्य, शेखर पोळ, राहुल पोळ, इक्बाल मिर्झा उपस्थित होते. खो-खो स्पर्धांमध्ये क्रीडा प्रबोधिनी विजयी आणि धर्मवीर संभाजी हा संघ उपविजयी राहिला.
 
 
कॅरम स्पर्धेचे उद्घाटन कांताई सभागृह येथे सुरतचे खा.सी.आर. पाटील आणि आ. सुरेश भोळे, राष्ट्रीय खेळाडू आयशा खान, अरविंद देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
 
 
त्याप्रसंगी उपस्थित बापू ठाकरे, रियाज शेख, कपिल पाटील, ऋषी येवले, नगरसेविका ज्योती चव्हाण, मंजूर खान, गणेश लोब्ध्ये, कय्युम खान होते. कॅरम स्पर्धेत पुरुषांमध्ये प्रथमस्थानी जुनेद बागवान, द्वितीय स्थानी मोहम्मद बुब्शीर. महिलांमध्ये प्रथमस्थानी नोझद सय्यद मोसिन, द्वितीय स्थानी भाग्यश्री लीलाधर तायडे.बुद्धिबळ स्पर्धेत पुरुषांमध्ये प्रथमस्थानी प्रशांत कासार, द्वितीय स्थानी रोहित पाटील, तृतीय स्थानी अजय पाटील. महिलांमध्ये पल्लवी आमले विजयी झाल्या.
 
 
अ‍ॅथ्लेटीक्स 100 मी. स्पर्धेत पुरुषांमध्ये प्रथम पंकज वराडे, द्वितीय मिलिंद वाघ, तृतीय राहुल खैरनार. महिलांमध्ये प्रथम ममता जांगीड, द्वितीय नूतन शेवाळे, तृतीय युगा नवाल आले.
 
 
अ‍ॅथ्लेटीक्स 400 मी. स्पर्धेत पुरुषांमध्ये प्रथम गौरव कोळी, द्वियीय राहुल खैरनार, तृतीय खूबचंद पाटील. महिलांमध्ये प्रथम मयुरी शर्मा, द्वितीय प्राजक्ता पाटील, तृतीय सुषमा हटकर. या सर्व स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाल्या.
 
 
विजयी स्पर्धक
 
क्रिकेटमध्ये एल.सी.बी. संघ विजयी, खो-खो मध्ये क्रीडा प्रबोधिनी विजयी, बुद्धिबळ स्पर्धेत पुरुषांमध्ये प्रशांत कासार विजयी, बुद्धिबळ स्पर्धेत महिलांमध्ये पल्लवी आमले विजयी, कॅरम स्पर्धेत पुरुषांमध्ये जुनेद बागवान विजयी, कॅरम स्पर्धेत महिलांमध्ये नोझद सय्यद मोसिन विजयी, अ‍ॅथ्लेटीक्स 100 मी स्पर्धेत पुरुषांमध्ये पंकज वराडे विजयी, अ‍ॅथ्लेटीक्स 100 मी स्पर्धेत महिलांमध्ये ममता जांगीड विजयी, अ‍ॅथ्लेटीक्स 400 मी स्पर्धेत पुरुषांमध्ये गौरव कोळी, अ‍ॅथ्लेटीक्स 400 मी स्पर्धेत महिलांमध्ये मयुरी शर्मा विजयी.
@@AUTHORINFO_V1@@