माजी विद्यार्थी हा शाळेचा अभिमान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018
Total Views |

धरणगावी मुख्याध्यापक प्रा.बी.एन.चौधरी यांचे प्रतिपादन

 
धरणगाव : 
 
येथील शाळेचा माजी विद्यार्थी सैन्यात देशसेवा करुन आता ज्या शाळेत शिकला त्या शाळेतील एन. सी. सी. विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी 18 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. जळगाव येथे बदली झाल्याने मिळणार आहे, ही बाब शाळेसाठी अभिमानाची आहे असे गौरवोद्गार मुख्याध्यापक बी.एन.चौधरी यांनी काढले.
 
माजी विद्यार्थी हवालदार नारायण पाटील यांच्या हृद्य सत्कारप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी एन.सी.सी.चे मेजर डी. एस.पाटील, उपमुख्याध्यापक एस. एम. अमृतकर, मेजर अरुण वळवी उपस्थित होते.
 
हवालदार पाटील यांची नुकतीच पतियाळा पंजाब येथून जळगाव येथील एन .सी.सी.बटालियनमध्ये नियुक्ती झालेली आहे. जिल्ह्यातील एन.सी .सी. असणार्‍या शाळांमध्ये ट्रेनिंग देण्याची संधी त्यांना आहे. त्यांनी पी.आर.हायस्कूल सोसायटीच्या महाविद्यालयात एन.सी.सी.चे धडे घेतले आहेत.
 
मातृभूमी, जन्म देणारी आई आणि शाळा या तिन्ही आपल्या माताच असतात. या तिघांची ज्यांना सेवा करायला मिळते ते खरे भाग्यवंत. हवालदार नारायण पाटील असेच एक भाग्यवंत असल्याचे बी.एन.चौधरी म्हणाले.
 
एन. सी. सी. कॅडेटस्ना नारायण पाटील यांच्यारुपात एक आदर्श अनुभवायला मिळाला असे मत डी.एस.पाटील यांनी प्रास्ताविकात नमूद केले. त्यांनी हवालदार नारायण सुरेश पाटील (नांद्रा, कानळदा) यांचा परिचय करुन दिला.
 
देशसेवा केलेला माजी विद्यार्थी आपल्या शाळेत आला हा आनंदाचा क्षण असल्याचे ते म्हणाले. यानिमित्ताने पाटील यांचा मुख्याध्यापक बी.एन.चौधरी यांचे हस्ते शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला.
 
 
या सत्काराने आपण भारावून गेलो आहोत असे हवालदार पाटील म्हणाले. शाळेत आल्यावर मला माझे शालेय जीवनातील दिवस आठवले असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी अभ्यास, शारीरिक व्यायाम करुन यशस्वी व्हावे असा सल्ला त्यांनी दिला. सूत्रसंचालन व आभार डी. एस. पाटील यांनी मानले.
@@AUTHORINFO_V1@@