फैजपूरला स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्रीदत्तजन्म अखंड, नामजप यज्ञ सप्ताहाची सांगता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018
Total Views |

 
 
फैजपूर : 
 
येथे दत्त जन्मोत्सवानिमित्त आयोजित सप्ताहमध्ये ग्रामदेवता मानसन्मान, हवन अग्नी व मंडल स्थापना, नित्य स्वाहाकार, गणेश, मनोबोध, चंडी, गीताई,स्वामी, रुद्र, मल्हारी, दत्तयाग बली, पूर्णाहुती, सत्यदत्त पूजन, महाआरती आदी धार्मिक विधी करण्यात आले.
 
 
धार्मिक, अध्यात्मिक प्रदर्शन, सणवार, व्रत वैकल्याअंतर्गत देवघर व घर कसे असावे, अधिक, श्रावण, चतुर्मास, पितरांची सेवा, सत्यनारायण महापूजा, मकरसंक्रांत, खंडेनवरात्री, होळी, गणेश व नवरात्रउत्सव, घटस्थापना, वटपौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा, हरितालिका पूजन, रक्षाबंधन, दीपअमावस्या, हिरण्यदान, तुळशीविवाह, लक्ष्मी पूजन, धनत्रयोदशी, भाऊबीज, ऋषी व नागपंचमी, कुलाचार उपासना आदी धार्मिक, अध्यात्मिक माहिती प्रदर्शनातून या काळात सेवेकर्‍यांनी भाविकांना माहिती दिली.
 
 
प्रास्ताविक केंद्र प्रमुख प्रकाश महाजन, याज्ञिक म्हणून शशिकांत पाटील, नरेंद्र गुजराथी आदींनी सेवा दिली. पंचक्रोशीतील स्वामी समर्थ सेवेकरी, भाविकांनी लाभ घेतला.
@@AUTHORINFO_V1@@