शेंदुर्णीत दत्त जयंती महोत्सव उत्साहात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018
Total Views |

आठ दिवसांपासून स्वामी समर्थ केंद्रावर पारायण

 
 
 
शेंदुर्णी ता.जामनेर : 
 
येथील कमलकिसन नगरातील श्री स्वामी समर्थ केंद्रावर 8 दिवसांपासून श्री दत्ताचे अखंड पारायण सुरू होते. त्यात परिसरातील सेवेकरी महिला ,पुरूषांनी सहभाग घेतला.
 
 
दुपारी 12 वाजता दत्त जयंती महोत्सव भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.माऊली, दत्तांची व शंकरांची आरती करण्यात आली.
 
केंद्रप्रमुख गुरू संजय कुमावत यांनी गुरुभक्तीचा महिमा या विषयावर उपस्थितांना प्रबोधन केले. होम हवन करण्यात आले. प्रसाद वाटप होत दुपारी गुरू माऊली व श्री गुरूदत्ताच्या प्रतिमांची मिरवणूक सनई -चौघड्याच्या निनादात नगराच्या मुख्य मार्गावरून काढण्यात आली. भव्य अशा पालखीत दत्ताच्या प्रतिमांची पूजा नागरिकांनी केली.
 
 
परिसरातील संपूर्ण रस्त्यावर सडा टाकून रांगोळी काढण्यात आली होती. पारंपरिक वेषभूषाधारी महिला, पुरूष आणि कलशधारी लहान मुलींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. श्री स्वामी समर्थ केंद्र बालसंस्कार केंद्रावर सांगता झाली.
@@AUTHORINFO_V1@@