खेलो इंडिया २०१९चे महाराष्ट्राकडे यजमानपद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018
Total Views |
 
 

पुणे : केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या द्वितीय खेलो इंडिया युथ गेम्स, २०१९ पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे येथे ८ ते २० जानेवारी २०१९ या कालावधीत घेण्यात येणार आहे. खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन करण्याची संधी महाराष्ट्राला मिळाली, ही अभिमानास्पद गोष्ट आहे.खेलोइंडिया युथ गेम्समध्ये विविध प्रकारच्या १८ खेळांच्या स्पर्धा, १७ वर्षाखालील २१ वर्षाखालील मुले मुली या गटात सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत देशभरातील शालेय खेळ महासंघाद्वारा आयोजित राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडू संघ राष्ट्रीय क्रीडा संघटनेद्वारा आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील संघ-खेळाडू, सी.बी.एस.सी. राष्ट्रीयस्पर्धेतील खेळाडू, स्पर्धा आयोजक राज्याने निवड केलेले खेळाडु, असे सुमारे १२ हजार ५०० खेळाडू, तांत्रिक अधिकारी, क्रीडा प्रशिक्षक व स्वयंसेवक सहभागी होणार आहेत, अशी माहिती क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी दिली.

 

खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ मध्ये आयोजित केलेल्या १८ क्रीडा प्रकारात १७ वर्षे मुले मुली व २१ वर्षे मुले मुली असे ७६९ खेळाडू, ७२ क्रीडा मार्गदर्शक तसेच व्यवस्थापक यास्पर्धेमध्ये राज्याची कामगिरी उंचावण्यासाठी सहभागी होणार आहेत. या खेलो इंडिया युथ गेम्समधील क्रीडाप्रकार ज्या क्रीडांगणामध्ये होणार आहेत, त्या सर्व क्रीडांगणांच्या प्रवेश द्वारांना महाराष्ट्रातील नामवंत क्रीडा पटुंची नावे व त्यांची प्रदर्शनी ठेवण्यात येतील. त्याचप्रमाणे क्रीडा संकुलात स्पोर्टस एक्स्पोव खेळांचा प्रत्यक्ष आनंद घेण्यासाठी विशेष सुविधा ठेवण्यात आली आहे. क्रीडापटू व खेळाडू यांना आवश्यक असणारे फिटनेस व संतुलित आहार या विषयांचे मोफत मार्गदर्शन या खेडो इंडिया गेम्सच्या निमित्ताने होणार आहेत.

 

क्रीडा क्षेत्रातील कौशल्य विकास व करियरच्या संधी याबाबतमोफत मार्गदर्शनचा लाभ या खेलो इंडिया युथ गेम्सच्या निमित्ताने मिळणार आहे. महाराष्ट्रातील विविध शाळातील खेळाडूंना या स्पर्धा पाहण्यासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना देशातील विविध राज्यातील नामवंत खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन महाराष्ट्रात होत असल्यामुळे महाराष्ट्रात क्रीडा संस्कृती निर्माण करण्याची संधी अधिक दर्जेदार व विकसित करण्याची संधी महाराष्ट्राला मिळत आहे. महाराष्ट्रातील शालेय व युवा खेळाडूंनी, क्रीडा स्पर्धांकडे आकर्षीत व्हावे व या क्रीडास्पर्धामध्ये आपला सहभाग नोंदवावा, हे आमचे उदिष्ट असल्याचेही श्री .तावडे यांनी सांगितले. खेलो इंडिया युथ गेम्सच्या निमित्ताने महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राच्या पायाभूत सुविधा अधिक दर्जेदार करण्याची संधी यानिमित्ताने मिळाली असल्याचे श्री. तावडे यांनी सांगितले. देशातील जास्त जास्तीत खेळाडुंना आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करण्याची संधी मिळावी तसेच आगामी ऑलिंम्पिक व आशियाई स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने गुणवंत व उदयोन्मुख खेळाडू निवडून त्यांना तंत्रशुध्द प्रशिक्षण देण्यासाठी खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे, असे श्री. तावडे यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@