शेंदुर्णीत माळी समाज मंगल कार्यालयाचे लोकार्पण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018
Total Views |

जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा

 
 
शेंदुर्णी ता.जामनेर : 
 
येथील श्री संत सावता महाराज माळी समाज विकास मंडळ संचालित माळी समाज मंगल कार्यालयाचा लोकार्पण सोहळा 23 रोजी सकाळी 12 वा. जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
 
 
अध्यक्षस्थानी गुढे येथील किसान ज्ञानोदय मंडळाचे अध्यक्ष डॉ.उत्तमराव महाजन होते. प्रमुख अतिथी म्हणून प.पू.विशुध्दानंद बापूजी ऋषीकेश (श्री गौरीशंकर महादेव संस्थान, पिंपरखेड), जे.के.चव्हाण, भाजपाचे ज्येष्ठ नेते उत्तमराव थोरात, भाजपा जिल्हाध्यक्ष गोविंद अग्रवाल, पारस जैन पतंसस्थेचे चेअरमन प्रकाश झंवर, माजी जि.प.सदस्य सागरमल जैन, माजी उपसरपंच नारायणराव गुजर, भाजपा युवा नेते यशवंत पाटील, तुकाराम पाटील, पं. दीनदयालजी उपाध्याय पतसंस्थेचे चेअरमन अमृत खलसे, माजी पं.स.सभापती बाबुराव घोंगडे, अ‍ॅड. सुकदेव गिते, ह.भ.प. शांताराम महाराज भगत, नंदकिशोर बारी, नगरपंचायत शेंदुर्णीचे नवनियुक्त नगरसेवक, भाजपा तालुका सरचिटणीस वासुदेव घोंगडे, शंकर घोंगडे, डॉ.सुभाष घोंगडे, वामनराव फासे, सुकदेव गिते, राजेंद्र गुजर, अविनाश निकम आदी उपस्थित होते.
 
 
सकाळी 9 वा. श्री संत सावता महाराज व विठ्ठल-रूख्मिणीची प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली. कलशधारी मुली, महिला, पुरूष भजनी मंडळ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शोभायात्रेनंतर सकाळी लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम झाला. त्यावेळी उपस्थित मान्यवरांचा माळी समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
 
 
माळी समाज मंगल कार्यालय बांधकामासाठी माळी समाजाबरोबर राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचेही मोठे योगदान लाभल्याने भव्य मंगल कार्यालय बांधण्यात आल्याचे मान्यवरांनी मनोगतातून व्यक्त केले.
 
 
शेवटी आशीर्वादपर मनोगत प.पू. विशुध्दानंद बापूजी ऋषीकेश यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक, सूत्रसंचालन, आभार माळी समाज अध्यक्ष कडोबा माळी यांनी केले.
@@AUTHORINFO_V1@@