नवाज शरीफ यांना ७ वर्षांसाठी तुरुंगवास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018
Total Views |
 

इस्लामाबाद : महिन्याभरापूर्वीच तुरुंगातून सुटका झालेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. अल-अझिझिआ स्टील मिल प्रकरणी भ्रष्टाचारविरोधी न्यायालयाने त्यांना सात वर्षाचा तुरुंगावास सुनावला.

 

शरीफ यांचे मालकीत्व असलेली सौदी अरेबियातील स्टील मिल प्रकरणात समाधानकारक उत्तरे देता न आल्याने त्यांना ही शिक्षा करण्यात आली आहे. पाकीस्तानच्या राजकारणात नवाज शरीफ यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात असून त्यांनी या निर्णयामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोपही केला आहे. शिक्षा सुनावली जात असताना शरीफ न्यायालयात हजर होते.

 

जुलैमध्ये न्यायालयात लंडन येथील अलिशान अपार्टमेंट खरेदीसंबंधी आरोपात त्यांना १० वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले. सप्टेंबर महिन्यात दाखल केलेल्या याचिकेनंतर त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. अल अझिझिआ स्टील मिल बरोबरच पनामा पेपर्स घोटाळ्यातदेखील शरीफ यांचे नाव समोर आले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@