वारकरी संप्रदायात मुक्ताबाईंचे अद्वितीय योगदान : प्रा.डॉ.गुट्टे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018
Total Views |

शेंदुर्णीत कै. आचार्य गजाननराव गरुड स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन

शेंदुर्णी ता.जामनेर : 
 
मुक्ताबाईंनी आपल्यापेक्षा मोठ्या भावंडांना मायेची पाखर दिली. त्यांना वात्सल्याने सावरले व प्रसंगी जागरूक करण्यासाठी आत्मीयतेने फटकारले देखील. सर्व तत्कालीन संतांनी एकमुखाने मुक्ताबाईचा ज्ञानाधिकार मान्य केला.
 
 
तिचा आदेश स्वीकारला.एकूणच वारकरी संप्रदायात मुक्ताबाईचे योगदान अव्दितीय आहे, असे प्रतिपादन नाशिक येथील संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. तुळशीराम गुट्टे यांनी केले.
 
 
येथील कै. आचार्य गजाननराव गरुड यांच्या 34 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प त्यांनी गुंफले.
ते म्हणाले की, मुक्ताबाईचे गुरु म्हणजे तिचेच मोठे बंधू संत निवृत्तीनाथ ज्यांना मुक्ताबाईंनी गुरुमंत्र दिला ते म्हणजे विसोबा खेचर आणि हठयोगी चांगदेव हे होत.
 
 
मुक्ताबाईंनी बालपणीच त्यांच्या समकालीन समाजाचे उग्र, कठोर वास्तव अनुभवले आणि ते पचवून लौकिक जीवनसंघर्षाकडे पाठही फिरविली. त्यांच्या वाणीत सांसारिक सुखदुःखाचा वा क्लेश-पीडांचा प्रतिसाद नाही.
 
 
सर्व जीवनच त्यांनी अलौकिक रंगात रमवून टाकले आहे. मुक्ताबाईंनी ज्ञानदेवांच्या संत मंडळीतील श्रेष्ठांमध्येदेखील आपल्या आध्यात्मिक अधिकार बळावर आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले. आजच्या महिला व युवतींनी मुक्ताई जीवन चरित्रातून शिकवण घेतल्यास वर्तमानकाळातील बर्‍याच समस्या दूर होऊ शकतील, असेही ते म्हणाले.
 
  
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को. ऑप.सोसायटीचे सचिव तसेच व्याख्यानमाला संयोजन समितीचे अध्यक्ष सागरमल जैन होते.
 
 
याप्रसंगी सहसचिव दीपक गरुड, प्रवीण गरुड, संचालक यु. यु. पाटील, पं. स. सदस्य किरण सूर्यवंशी, सतीशराव काशीद , पं.स.सदस्य शांताराम गुजर व सुधाकर बारी, प्राचार्य डी.आर.शिंपी, एस. बी. पाटील, अविनाश निकम, रवींद्र गुजर, अशोक औटे, समन्वयक डॉ. प्रशांत देशमुख, डॉ.संजय भोळे,अशोक जैन, विलास अहिरे, दीपक जाधव, देवेंद्र पारळकर, योगेश सोनार,निलम अग्रवाल, दिग्विजय सूर्यवंशी, शेख हमीद, अतुल जहागिरदार, उपप्राचार्य एन.एस. सावळे, उपप्राचार्य आर.जी. पाटील तसेच शेंदुर्णी व परिसरातील ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. वासुदेव पाटील यांनी केले. सूत्रसंचालन पी.जी.पाटील व आभार पी. पी. पाटील यांनी मानले.
@@AUTHORINFO_V1@@